आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिरियाचे संकट वाढल्यास साेने, क्रूड तेल महागणार; साडेचार वर्षात सर्वाधिक भाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 मुंबई - सिरियात सतत असलेली अनिश्चितता व गत अाठवड्यात अमेरिकेच्या पुढाकाराने झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे क्रूड तेल, साेने व जिऱ्याचे भाव वाढले अाहेत. बाजारतज्ज्ञांनुसार सिरियातील अस्थिरता अाणखी वाढल्यास या तिन्ही वस्तूंचे भाव अजून वेगाने वाढतील. विशेष बाब म्हणजे, जिरे व क्रूड तेलाच्या किमती सध्या केवळ शक्यतेच्या अंदाजामुळेच वाढत अाहेत.

 
अागामी महिन्यांत साेन्याच्या भावात अाणखी तेजी पाहावयास मिळेल. बाजारात गत १५ दिवसांतच साेन्याचे भाव २.८५ % वाढलेत. दुसरीकडे जिऱ्याने बाजारपेठांत १६ हजार रुपयांचा भाव पार केला अाहे व त्यात २.८५ % तेजी नाेंदवण्यात अालीय. तसेच क्रूड तेलाचे अांतरराष्ट्रीय दर ९.७१ % वाढले असून, दराने ७३ हजार डाॅलर्सची पातळी अाेलांडली अाहे. 


भारतात डाॅलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे दुहेरी मार सहन करावा लागत अाहे. कारण भारत हा कच्चे तेल अायात करणारा जगातील तिसरा सर्वात माेठा देश असून, तेलाची खरेदी डाॅलर्समध्ये केली जाते. डाॅलर महागल्याने डिझेल-पेट्राेलचे दर वाढत अाहेत. याच कारणामुळे पेट्राेल व डिझेलचे भाव गत साडेचार वर्षांत सर्वाधिक झालेत. सिरिया हा सेंद्रिय जिरे उत्पादन करणारा जगातील सर्वात मुख्य देश अाहे. परिणामी, सिरियातील जिऱ्याला अनेक देशांतून मागणी असते. केडिया कमाेडिटीचे प्रमुख अजय केडिया यांच्या मतानुसार सिरिया संकटामुळे जिरे, साेने व क्रूड  तेलाचे भाव वाढत अाहेत. जिऱ्याचे उत्पादन यंदा चांगले असूनही दर वाढत अाहेत. मेपर्यंत निर्यातीच्या मागणीनुसार दर सतराशे रुपयांपर्यंत पाेहाेचू शकतात.  साेन्याबाबत केडियांनी सांगितले की, सिरिया-अमेरिका-रशिया, अमेरिका-चीन वादामुळे अनिश्चित वातावरण, रशिया-चीनच्या सेंट्रल बंॅकेद्वारे साेने खरेदी करणे व अांतरराष्ट्रीय पातळीवर डाॅलर कमकुवत झाल्याने भविष्यात साेन्याचे भाव वाढतील. तेलाच्या किमती वाढू नयेत, असे गत दाेन वर्षांत तेल अायातदारहून निर्यातदार बनलेल्या अमेरिकेचे प्रयत्न अाहेत; परंतु सिरियाचे संकट अधिक दाट झाल्यास ब्रेंट क्रूड तेलाचे (हेच तेल भारतात येते) भाव पुढील तीन महिन्यांत ८० डाॅलर्स प्रतिबॅरलपर्यंत पाेहाेचू शकतात.  

 


पुढील स्लाईडवर वाचा वायदे बाजार ....

 

बातम्या आणखी आहेत...