आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळ सहकुटुंब देवदर्शनाला, शिर्डीत साईबाबांच्या चरणी लीन, पाहा PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज सकाळी 11 च्या सुमारास शिर्डीत जात साईबाबांचे दर्शन घेतले. - Divya Marathi
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज सकाळी 11 च्या सुमारास शिर्डीत जात साईबाबांचे दर्शन घेतले.

शिर्डी- तुरूंगातून मागील महिन्यात जामीनावर सुटलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सकाळी 11 च्या सुमारास शिर्डीत जात साईबाबांचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

शेतकऱ्यांना चांगले दिवस येवोत आणि जनतेला सुखी करा, अशी प्रार्थना साईबाबांना केल्याचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले. भुजबळ यांनी शनिवारी पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांच्यासह पत्नी तसेच सुना व नातवंडांना घेऊन संध्याकाळी साई समाधीचे दर्शन घेतले.

 

साईबाबांची पाद्यपूजा करून ते मंदिराबाहेर येताच त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली. साई समाधीच्या दर्शनानंतर त्यांनी द्वारकामाईत जाऊन दर्शन घेतले. द्वारकामाईतल्या दर्शनानंतर त्यांनी पाच मिनिटे बसून साईंचे ध्यान केले.

 

दरम्यान, भुजबळ यांच्या दाैऱ्यादरम्यान, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी स्वागत साेहळ्याच्यानिमित्ताने जाेरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. अनेक ठिकाणी हाेर्डिंग्जही लावली आहेत. 19 जूनपर्यंत भुजबळ जिल्हा दाैऱ्यावर राहणार असून प्रामुख्याने शिर्डीनंतर त्र्यंबकेश्वर, सप्तशंृग गडावर जात दर्शन घेतले. याबराेबरच मंगळवारी (19 जून) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विविध मागण्यांसाठी निवेदनही देतील. भुजबळ यांच्या नाशिक दाैऱ्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण अाहे.

बातम्या आणखी आहेत...