आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळ नाशिकमध्ये: समर्थकांकडून ढोल- ताशांच्या गजरात जंगी स्वागत व शक्तीप्रदर्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महाराष्ट्र सदन घाेटाळ्यासह नानाविध अाराेपांमुळे तब्बल दाेन वर्ष तुरुंगात असलेले व अलीकडेच जामिनावर सुटलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ हे अडीच वर्षांच्या कालावधीनंतर आज दुपारी 1 वाजता नाशिकमध्ये दाखल झाले. तुरूंगातून सुटल्यानंतर हे काका- पुतणे पहिल्यांदाच नाशिकमध्ये दाखल झाले. 

 

दरम्यान, पाथर्डी फाट्यांवर भुजबळ समर्थकांनी त्यांचे ढोल- ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह समता परिषदेचे व सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी अनेकांनी 'मी भुजबळ' अशा टोप्या घातल्या होत्या. सुमारे अर्धा तास भुजबळ काका-पुतण्याची मिरवणूक काढण्यात आली. भुजबळ यांचे जोरदार स्वागत करून विविध गटांकडून शक्तिप्रदर्शन केले. यानंतर भुजबळांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले व उपस्थित समर्थकांना संबोधित केले.

 

भुजबळ म्हणाले, माझ्या अडचणीच्या काळात एक नाशिकर म्हणून तुम्ही माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या पाठीशी राहिला त्याबाबत सर्वांचे आभार मानतो. तुम्ही दिलेले प्रेम कधीच विसरणार नाही. तुमचे प्रेम माझ्यावर व माझ्या कुटुंबियांवर राहील असा विश्वास व्यक्त करतो. माझ्या सुटकेसाठी मागे तुम्ही लोकांनी एक मोठा मोर्चा काढला तो क्षण मी कधीही विसरणार नाही. तुम्हा सर्वांचे आभार अशा शब्दांत भुजबळांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांचे पुतणे समीर भुजबळ आणि पुत्र पंकज भुजबळ उपस्थित होते. 
 
भुजबळांनी पुतण्या समीर, पुत्र पंकज यांच्यासह सकाळी मुंबईहून नाशिककडे प्रयाण केेल. इगतपुरी, वाडीवऱ्हे येथे अागमन झाल्यानंतर त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यानंतर दीड वाजता पाथर्डी फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पंचवटीतील गणेशवाडीच्या महात्मा फुले पुतळा, शालिमार येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यानंतर भुजबळांनी मुंबईनाका येथील राष्ट्रवादी भवनात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. 

 

दरम्यान, भुजबळ यांच्या दाैऱ्यादरम्यान, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी स्वागत साेहळ्याच्यानिमित्ताने जाेरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. शहरात अनेक ठिकाणी हाेर्डिंग्जही लावली आहेत. 19 जूनपर्यंत भुजबळ जिल्हा दाैऱ्यावर राहणार असून प्रामुख्याने शिर्डी, त्र्यंबकेश्वर, सप्तशंृग गडावर दर्शनासाठीही ते जाणार अाहेत. याबराेबरच मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विविध मागण्यांसाठी निवेदनही देतील. भुजबळ यांच्या नाशिक दाैऱ्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण अाहे. 

बातम्या आणखी आहेत...