आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळांना केईम हॉस्पिलटमध्ये हलविले, विधीमंडळात गाजला होता विषय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मनी लाँड्रिंगप्रकरणी तुरूंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जेजे हॉस्पिटलमधून केईममध्ये हलविण्यात आले आहे. भुजबळ पोटाचे व आतड्याचे विकाराने सध्या त्रस्त आहेत. मात्र, याची सेवा जेजेमध्ये नसल्याने त्यांना केईममध्ये दाखल केले आहे. यासाठी जेल प्रशासन व हायकोर्टाची परवानगी मिळाली आहे.

 

छगन भुजबळ यांना पोटदुखीसह, दमा, मधुमेह, बीपी, अन्ननलिका व आतड्यांशी संबंधित आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या उपचारावर चांगल्या हॉस्पिलटमध्ये उपचार मिळावेत अशी मागणी होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही मागील आठवड्यात विधीमंडळात याबाबत जोरदार आवाज उठवला होता. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही सरकारला पत्र लिहून भुजबळांच्या जीवाला बरे-वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील असा इशारा दिला होता. अखेर राज्य सरकारच्या सूचनेनुसार भुजबळांना केईममध्ये हलविल्याचे सांगितले गेले. 

 

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. त्यांना जे. जे. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे. त्यांच्यात लढण्याची क्षमता कमी होत आहे. अशात त्यांना फॉर्म भरण्यासाठी लाईनमध्ये उभे केले जात आहे. ही बाब माणुसकीला धरून नाही, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केला होता.

बातम्या आणखी आहेत...