आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य महामार्गांवर 160 ठिकाणी स्वच्छतागृहे उभारणार, चंद्रकांत पाटील यांची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या महामार्गावर प्रवाशांच्या सोईसाठी १६० ठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी साेमवारी केली. तसेच या स्वच्छतागृहांची माहिती गुगल मॅपसारख्या अॅपवरही उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

वर्षा पवार- तावडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय   स्त्री शक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात  पाटील यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने राज्यातील प्रमुख महामार्गांवर स्वच्छतागृहांची उभारणी करावी, यासह महिला प्रवाशांच्यादृष्टीने आवश्यक असलेल्या सुविधांच्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.


महिलांसाठी महामार्गावरील स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स व्हेडिंग मशिन आणि सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनेटर उपलब्ध करुन देण्याची मागणीही महिलांनी केली. त्यावर पाटील यांनी ही मागणी मान्य करत, महामार्गावरील स्वच्छतागृहांमध्ये याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले. महामार्गाच्या कडेला उभारण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहांच्या सुरक्षेची जबाबदारी तसेच दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी स्वच्छतागृह उभारणाऱ्या संस्थेकडेच तीन वर्षांसाठी असेल. तसेच तसेच संबंधित व्यक्तीकडून स्वच्छतागृहांची देखभाल योग्यप्रकारे होते की नाही, हे पाहण्याची जबाबदारी महिला बचत गटाकडे देण्यात येईल, असेही  ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...