आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोहर पर्रिकरांचा अमेरिकेतील उपचारांना चांगला प्रतिसाद; गोवा सरकारची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या आजारावर उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. मात्र, अधिक चांगल्या उपचारांसाठी त्यांना अजून काही काळ अमेरिकेत रहावे लागणार आहे. त्यामुळे पर्रिकर लवकरच मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी परतणार असल्याची माहिती निराधार असल्याचे गोवा सरकारने म्हटले आहे.

 

 

पर्रिकर यांना 15 फेब्रुवारी रोजी पोटात दुखत असल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पर्रिकर यांच्या स्वादुपिंडाला सूज आली होती. त्यावेळी त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, त्यानंतर त्यांनी गोवा विधानसभेचा अर्थसंकल्पही सादर केला. मात्र, त्यानंतर त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यांना पुन्हा लीलावतीत दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर अधिक चांगल्या उपचारांसाठी त्यांना अमेरिकेत हलवण्यात आले.

 

बातम्या आणखी आहेत...