आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'स्टिफन हॉकिंग यांच्या रूपाने विश्वाच्या उत्पत्तीचे कोडं उलगडणारा महान शास्त्रज्ञ गमावला'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांच्या निधनाने विश्वाच्या उत्पत्तीचे कोडे सोप्या भाषेत उलगडणारे आणि वैज्ञानिक संशोधन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारे एक महान व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

 

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, हॉकिंग हे संशोधन क्षेत्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर दुर्धर आजाराशी संघर्ष करीत त्यांनी आयुष्यभर केलेले संशोधन कार्य अभूतपूर्व असून या क्षेत्रासाठी दीपस्तंभी आणि प्रेरणादायी आहे. याबरोबरच प्रदीर्घ काळ ज्ञानदान करून त्यांनी शास्त्रज्ञांच्या नव्या पिढ्या घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

 

बिग बँग आणि कृष्ण विवरांसंदर्भातील सविस्तर वर्णन असलेले अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे पुस्तक एक अजरामर लिखाण आहे. त्यांच्या निधनाने विज्ञान जगताला लोकाभिमुखतेची दिशा देणारे एक असामान्य व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

बातम्या आणखी आहेत...