आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- सुसंस्कृत व स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी (17 मार्च 1946) 72 व्या वर्षात पदार्पण केले. सध्या महाराष्ट्र विधानसभेत आमदार असलेले चव्हाण सध्या निवांत जीवन जगत आहेत. संयमी, उच्चशिक्षीत, प्रतिभावान यासारखी अशी कितीही बिरूदावली चव्हाण यांना सूट होतात. मितभाषी राजकारणी म्हणूनही पृथ्वीराज चव्हाणांची ओळख आहे. ते कमी पण मुद्यांचे आणि मोजकेच बोलतात. 72 व्या वर्षातही पृथ्वीबाबा (हितचिंतक त्यांना बाबा म्हणतात) आजही ते फिट अॅंड फाईन आहेत. या वयातही ते स्वत:ला फिट ठेवण्यासाठी रोज रात्री बॅंडमिंटन खेळतात. आपण आणि आपलं काम भले हा विचार घेऊन ते काम करतात.
राजकारणात चमकोगिरी किंवा पुढे पुढे करण्यात त्यांना काडीचाही रस नाही. तसेच आपण फार मोठे राजकारणी आहोत हे दाखविण्याचा प्रयत्नही ते करत नाहीत. अत्यंत साधी राहणी, शालीन, लो-प्रोफाईल राहणारे चव्हाण विरोधकांवरही केवळ वैचारिक व धोरणात्मकच टीका करतात. कोणावरही व्यक्तीगत टीका न करता केवळ त्यांच्या धोरणाला, विचाराला विरोध करतानाही त्यांच्यातील सुसंस्कृतपणा दिसून येतो. मितभाषी असले तरी ते तेवढेच खंबीर व स्वाभिमानी बाण्याचे आहेत.
पृथ्वीबाबा आपल्या कुटुंबियांबाबतही तेवढेच सजग आहेत. कौटुंबिक गोष्टी ते सार्वजनिक स्तरावर आणत नाहीत. अनेकांना त्यांना किती मुले आहेत याचीही माहिती नाही. पत्नी सत्वशिला मोजक्या सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेत असतात. मात्र, मुले या गोष्टीपासून कोसो दूर आहेत कारण त्यांना राजकारणात अजिबात रस नाही. पृथ्वीबाबांनाही वाटत नाही त्यांनी राजकारणात यावे. मुलांना ज्या क्षेत्रात काम करायचे ते त्यांना ठरवू दे असा दंडक बाबांचा आहे. चव्हाण यांना दोन मुले आहेत. मुलगी अंकिता आणि मुलगा जय. थोरल्या अंकिताचे 2013 साली लग्न झाले आहे. आर्किटेक्चर असलेल्या अंकिताचे प्रखर भंडारी या आयटीतील प्रोफेशनलसोबत लग्न झाले आहे. अंकिताचा पती प्रखर पंजाबमधील बिझनेस फॅमिलीतील आहे. तर, मुलगा जयने पुण्यातील एमआयटी येथून इंजिनिअरींग व नंतर समाजशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. सध्या तो विदेशात कार्यरत आहे.
पुढे स्लाईडद्वारे वाचा, बाबांची मुले राजकारणापासून का आहेत दूर......
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.