आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अत्याचारावर नियंत्रण ठेवा;तिवारी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात ४५ मायक्रो फायनान्स कंपन्यांनी ९८०० कोटी रुपये वाटले असून याच्या वसुलीपोटी शेतकऱ्यांवर अत्याचार करण्यात येत असून या कंपन्या शेतकऱ्यांची लूट करत आहेत. शेतकऱ्यांची लूट आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार यावर नियंत्रण घालण्याची गरज असल्याने सरकारने यावर कारवाई करावी, अशी मागणी कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे. 


नांदेड  येथील अॅड. राणा सारडा यांनी दिलेल्या धक्कादायक माहितीनुसार खेड्यात घराघरात जाऊन मायक्रो फायनांस कंपन्या कर्ज वाटतात. नंतर त्याची वसुली मुंबई येथे विशेष लवादामार्फत करून त्यामध्ये एक हजार कर्ज वसुलीच्या खटल्यात ९९९ प्रकरणात शेतकऱ्यांकडून कोणतीही बाजु मांडण्याची संधी न देता एकतर्फी वसुलीचा आदेश घेऊन जुलमी पठाणी पद्धतीने वसुली केल्याचे उघडकीस आले आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांचा  सुरू असलेला हैदौस अनावर झाला असल्याने शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यावर तात्काळ नियंत्रण आणण्याची मागणी केली जात आहे. 


सध्या विदर्भ व मराठवाड्यात शेतकरी व शेतमजूर कृषी संकटामुळे बँकांची दारे ग्रामीण जनतेला बंद झाल्याने मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कचाट्यात सापडत आहे. या कंपन्यांनी केलेला पतपुरवठा एका नवीन खासगी सावकाराच्या युगाचा प्रारंभ करणारा ठरला आहे. त्यातच आता महाराष्ट्राचा समावेश सर्वाधिक मायक्रो फायनान्स कंपन्या असणाऱ्या पहिल्या पाच राज्यांत होतो. याचे प्रमुख  कारण  महाराष्ट्र सरकारने आंध्र प्रदेश व तामिळनाडू या राज्याप्रमाणे  कडक कायदे न केल्याने आज ग्रामीण जनता या कंपन्यांच्या कचाट्यात फसली आहे. शेतकरी मिशननेकडे शेतकऱ्यांनी व ग्रामीण जनतेने केलेल्या तक्रारीमध्ये  रिझव्र्ह बँकेच्या मार्गदर्शक सूत्रानुसार मायक्रो फायनान्स कंपन्या कोणत्याही अटी व शर्तीचे पालन करत नाही. २६ टक्क्यांपेक्षा जादा व्याज आकारता येत नाही, असा नियम असतानाही या कंपन्या २३ टक्क्यांपासून ते ३६ टक्क्यांपर्यंत व्याज आकारणी केल्याचे समोर आले आहे.  त्यामुळे या कंपन्यावर सरकारने तातडीने कारवाई करावी,अशी मागणी त्यांनी केली. 

 

कंपन्यांच्या तगाद्याने शेतकऱ्याची आत्महत्या

 

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याची कथा यावर जळजळीत प्रकाश टाकणारी आहे. दारव्हा तालुक्यातील  मांग किन्ही  या गावात रामधन राठोड तीन  एकर कोरडवाहू जमीन असणारा शेतकरी. पहिल्यांदा स्टेट बँकेचे दीड लाख रुपये कर्ज काढले. त्याचे हप्ते आणि व्याज भरण्यासाठी फायनान्स कंपनी कडून कर्ज काढले.  दोन-तीन वर्षांत त्याच्यावर पाच लाखांचे कर्ज झाले. व्याजाची रक्कम भरता भरता त्याची दमछाक होऊ लागली. तीन एकर कोरडवाहू शेतीतील उत्पन्न आणि नवरा-बायकोने केलेली मोलमजुरी यांची तोंडमिळवणी.. कशाचा मेळ कशाला लागेना. या फायनान्स कंपनीने वसुलीसाठी रामधन राठोड यांच्या मागे लागल्या. तो जिथे काम करेल त्या ठिकाणी जाऊन वसुलीचा तगादा लावू लागले. कंपन्यांचे प्रतिनिधी रात्रीी घरी येऊ लागले. हे असह्य झाल्याने रामधनने आत्महत्या केली. 

बातम्या आणखी आहेत...