आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर घेतलेल्या जाहीर सभेमध्ये अनेक विषयांवरून हल्लाबोल केला. सरकारवर टीका करताना राज ठाकरे यांनी कोणत्या कोणत्या पद्धतीने सरकार देश आणि राज्यात गैरप्रकार करत आहेत, याचा पाढाच वाचला. राज ठाकरेंच्या या तडाख्यात बॉलिवूड सेलिब्रिटीही अडकले . विशेष म्हणजे राज ठाकरेंनी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारवरही हल्लाबोल केला. देशभक्तीचा पाढा वाचणारा अक्षय स्वतःच भारताचा नागरिक नसून तो कॅनडाचा नागरिक आहे, असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंच्या या आरोपानंतर पुन्हा एकदा अक्षय कुमारच्या नागरिकत्वावर चर्चा सुरू झाली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे..
राज ठाकरे यांनी विविध माध्यमातून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, अक्षय कुमार सध्या विविध देशभक्तीवर चित्रपटात झळकत आहे. अक्षय मनोज कुमार बनण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या चित्रपटात सर्वकाही 'भारत' असते. पण अक्षयचे चित्रपट हे सरकारने स्पॉन्सर केलेले असताता असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला. विशेष म्हणजे अक्षय कुमार भारताचा नागरिकच नाही, तो कॅनडाचा नागरिक आहे असा आरोप राज यांनी केला.
विकिपीडियानुासर अक्षय कुमार कॅनडाचा नागरिक
राज ठाकरेने भाषणात विकिपीडियाचा उल्लेख केला. त्यानुसार विकिपीडियावर सर्च केले असता अक्षय कुमार हा भारतात जन्मलेला कॅनडियन अॅक्टर आणि प्रोड्युसर असल्याचा उल्लेख त्यावर आहे. म्हणजेच अक्षय कुमार हा कॅनडाचा नागरिक असल्याचे त्यात म्हटले आहे.
काय म्हणतो अक्षय..
अक्षय कुमारच्या पासपोर्टचा हा वाद काही नवा नाही. काही वर्षांपूर्वी त्याला हेथ्रो विमानतळावर पासपोर्टच्या कारणावरून अडवून ठेवण्यात आले होते. त्याचवेळी त्याच्याकडे कॅनडाचा पासपोर्टही असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा बरीच चर्चा झाली. अक्षय कुमारला याबाबत विचारण्यात आले होते. त्यावेळी त्याने कॅनडाचे नागरिकत्व ऑनररी (मानद) असल्याचे म्हटले होते. कॅनडाचे मानद नागरिकत्व असलेल्या व्यक्तीला प्रत्यक्षात काही हक्क किंवा अधिकार मिळत नाहीत.
काय आहे नियम..
भारतामध्ये दुहेरी नागरिकत्वाला मान्यता नाही. इतर कोणत्याही देशाचे नागरिकत्व स्वीकारण्यासाठी आधी भारताचे नागरिकत्व सोडावे लागत असते. मात्र अक्षयने अद्याप भारताचे नागरिकत्व सोडल्याचेही समोर आलेले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.