आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवस्मारकाच्या उंचीवरून मंत्री-विराेधकांत खडाजंगी;स्थगन प्रस्ताव चर्चेची मागणी फेटाळली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अरबी समुद्रामध्ये उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित आंतरराष्ट्रीय स्मारकातील पुतळ्याची उंची ११२ फुटांनी कमी केल्याचा आरोप करत बुधवारी विरोधकांनी सरकारला जाब विचारला.  राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी या प्रश्नी स्थगन प्रस्तावाच्या चर्चेची मागणी केली. मात्र, अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मागणी ती फेटाळली. त्यानंतर विरोधी बाकांवरील सदस्यांनी अध्यक्षांसमोरील वेलमध्ये उतरून गोंधळ घातला. उंची कशासाठी कमी केली याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली.


छत्रपती हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे. अरबी समुद्रातील छत्रपतींचा हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा असेल.  हा पुतळा २१० मीटरउर्वरित. पान १०

 

अजित पवार म्हणाले...
राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार म्हणाले, शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्य करता व दुसरीकडे शिवस्मारकाची उंची कमी करता. हे बरे नाही. छत्रपतींचे जगातले सर्वात उंच स्मारक उभारले गेलेच पाहिजे. स्मारकाची उंची कमी करण्याचा प्रयत्न सरकारने केला तर जनता तुम्हाला कदापिही माफ करणार नाही. तुम्हाला त्याची किंमत आगामी काळात मोजावीच लागेल.

 

जगातील सर्वात उंच स्मारक :  मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य व केंद्रात आघाडीची सत्ता असताना प्रकल्पाची चर्चा सुरू झाली. मात्र, त्यांना स्मारकाची एकही वीट रचता आली नाही. अामचे सरकार छत्रपतींचे जगातले सर्वात उंच स्मारक उभारणार आहे. त्याची रचना व त्याची उंची ही गुणोत्तर प्रमाणात ठरवली आहे, त्यामुळे खर्च कमी व्हावा, हा बदलामागचा हेतू नाही.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...