आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- प्लास्टिक पिशव्या तयार करणाऱ्या उद्योजकांनी अाता कापडी पिशव्या तयार कराव्यात असे, आवाहन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी साेमवारी केले. प्लास्टिक उद्योजकांच्या शिष्टमंडळासोबत अायाेजित बैठकीत ते बाेलत हाेते.
राज्यात गुढी पाडव्यापासून प्लास्टिक बंदी लागूर करण्यात अाली अाहे. या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने अापल्या समस्या कदम यांच्यासमाेर मांडल्या. त्यावर कदम म्हणाले, ‘प्लास्टिक उद्योजकांना त्यांचाकडील शिल्लक असलेल्या प्लास्टिकच्या वस्तू, कॅरीबॅग, पिशव्या नष्ट करण्यासाठी निश्चितच काही कालावधी दिला जाईल. त्याचबरोबर कुठलेही प्लॅस्टिकचे उत्पादन, कॅरीबॅग निर्माण होणार नाहीत. याची काळजी घेतली पाहिजे. प्लास्टिक उद्योजकांनी याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्याकडे दररोज ११०० टन कचरा निर्माण होतो. त्याची विल्हेवाट कशी लावावी हा मोठा प्रश्न आहे. भविष्यात आरोग्याचा मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर प्लास्टिक बंदीला पाठिंबा देऊन समाजामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. अनेक महिला बचतगटांनी कॅरीबॅगला पर्याय म्हणून कापडी पिशव्या बनविणे सुरू केले आहेत. जे उद्योजक कॅरीबॅग तयार करायचे त्यांनी कागदी पिशव्या तयार करण्याकडे वळले पाहिजे. त्यासाठी शासन नक्कीच मदत करेल. राज्यातील प्लास्टिक कारखान्यात काम करणारे जे कामगार असतील व प्लास्टिक बंदीमुळे बेरोजगार होणार असतील तर त्यांचा बाबतीतही योग्य निर्णय घेऊ. अशा कामगारांची यादी प्लास्टिक उद्योजकांनी द्यावी.’
एस.एम.एस. कंपनीने मुंबई सोडावी
मानखुर्द येथील एस.एम.एस. कंपनीतून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याबाबत या कंपनीवर कारवाई करण्यासाठी आमदार अबू आझमी यांच्या शिष्टमंडळाने पर्यावरण मंत्रांची भेट घेऊन प्रदूषणाबाबत चर्चा केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.