आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेबांच्‍या अस्‍थी या पोलिस अधिका-याच्या घरी, बुध्‍दवंदनेसह केले जाते पूजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रवीण मोरे यांनी वडील भाऊसाहेबांच्‍या निधनानंतर बाबासाहेबांच्‍या अस्‍थी विशेष काळजी घेऊन जपून ठेवल्‍या आहेत. या अस्‍थींचा कलश ठेवण्‍यासाठी मोरे यांनी खास तयार करुन घेतलेले काचेचे केस. - Divya Marathi
प्रवीण मोरे यांनी वडील भाऊसाहेबांच्‍या निधनानंतर बाबासाहेबांच्‍या अस्‍थी विशेष काळजी घेऊन जपून ठेवल्‍या आहेत. या अस्‍थींचा कलश ठेवण्‍यासाठी मोरे यांनी खास तयार करुन घेतलेले काचेचे केस.

औरंगाबाद- थोर व्‍यक्तिमत्‍व, महापुरुषांशी संबंधित प्रत्‍येक वस्‍तू, प्रत्‍येक आठवण समाजासाठी एक ठेवाच असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर कोट्यवधी जनतेचे आराध्‍य दैवत. या महामानवाच्‍या अस्‍थी पोलिस उपअधीक्षक प्रवीण मोरे यांच्‍याकडे आहेत. वडील भाऊसाहेब मोरे यांच्‍याकडून हा ठेवा त्‍यांच्‍याकडे आला.

 

बाबासाहेबांच्‍या महापरिनिर्वाणानंतर मोजक्‍याच निकटवर्तीयांना अस्थिकलश सुपुर्द करण्‍यात आला होता. त्‍यात भाऊसाहेबांच्‍या समावेश होता. बाबासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्‍यासाठी या अस्‍थी पुढील पिढीकडे हस्‍तांतरित केल्‍या जात आहेत. प्रवीण यांनी त्‍या जिवापाड जपून ठेवल्‍या असून बाबासाहेबांच्‍या जयंतीला भीमप्रेमींना दर्शनासाठी हा ठेवा खुला केला जातो.

 

भाऊसाहेब मोरे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अत्‍यंत विश्‍वासून निकटवर्तीय होते. ते मूळ औरंगाबादमधील कन्‍नडचे रहिवासी. मोठ्या कष्‍टाने शिक्षण घेतले. पुण्‍यातील एस. पी. कॉलेजमधून बीएची पदवी संपादन केली. भाऊसाहेब मराठवाडयातील पहिले दलित पदवीधर ठरले. सन 1935 मध्‍ये येवल्‍यात बाबासाहेबांची जाहीर सभा झाली होती. ती भाऊसाहेबांनी ऐकली. त्‍यानंतर त्‍यांनी बाबासाहेबांना मराठवाडयात येण्‍याचे निमंत्रण दिले. त्‍यानुसार कन्‍न्‍ड तालुक्‍यातील मकरणपूर (पूर्वीचे डांग) येथे 30 डिसेंबर 1938 रोजी बाबासाहेबांची सभा झाली.

 

याच सभेत भाऊसाहेबांनी जगाला 'जय भीम'चा नारा दिला. यानंतर बाबासाहेबांनी स्‍थापन केलेली उच्‍चशिक्षित दलितांची आघाडी ऑल इंडिया वर्किंग कमिटीचे सदस्‍यपद भाऊसाहेबांना मिळाले. 1942 मध्‍ये आंबेउकरांनी 'हैदराबाद स्‍टेट शेड्युल्‍ड कास्‍ट फेडरेशन' हा दलितांचे संघटन असणारा पहिला पक्ष स्‍थापन केला. या पक्षाच्‍या मराठवाडा शाखेचे अध्‍यक्षपद भाऊसाहेबांना मिळाले. 1942 मध्‍ये त्‍यांना निझामाच्‍या राजवटीत प्रोपोगंडा लेव्‍ही ऑफिसर (महसूल अधिकारी) या गॅझेटेड पदावरील क्‍लास-1 ची नोकरी मिळाली. अत्‍यंत जबाबदारीचे पद होते. त्‍यांच्‍याकडे चार जिल्‍ह्यांची जबाबदारी होती, परंतु बाबासाहेबांच्‍या सांगण्‍यावरुन त्‍यांनी 18 महिन्‍यांतच नोकरीचा राजीनामा दिला. नंतर अखेरच्‍या श्‍वासापर्यंत बाबासाहेबांचे विश्‍वासू म्‍हणून ते समाजकार्यात सक्रिय राहिले.

 

पुढील स्‍लाईड्सवर वाचा,

 

- बाबासाहेबांच्‍या निधनानंतर शोकसभेत घेण्‍यात आलेला निर्णय.
- यांना सूपूर्द केल्‍या अस्‍थी.

बातम्या आणखी आहेत...