आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीच्या पेपर तपासणीवरील शिक्षकांचा बहिष्कार मागे; शिक्षक महासंघाचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/औरंगाबाद- कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या काही प्रमुख मागण्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज मान्य केल्या आहेत, तर उर्वरित मागण्यांवर अर्थसंकल्पानंतर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे शिक्षक महासंघाने बारावी पेपरतपासणीवरील बहिष्कार मागे घेतला आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांच्या विविध मागण्यांसोबत चर्चा सुरु होती. यापूर्वीच त्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. आज झालेल्या चर्चेअंती अन्य काही प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित मागण्या या अर्थ विभागाशी संबंधित असल्यामुळे अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर चर्चा होऊन त्या मागण्या सकारात्मकरित्या सोडविण्यात येतील, तसेच अन्य काही मागण्या विधीमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर अर्थमंत्र्यासमवेत बैठका घेऊन त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज दिली. 

 


महासंघाच्या महत्त्वाच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या असून आता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करुन महासंघाने उत्तरपत्रिका तपासणीचे बहिष्कार आंदोलन मागे घ्यावे असे आवाहनही तावडे यांनी केले. त्यानंतर आता शिक्षक महासंघाने  बारावी पेपरतपासणीवरील बहिष्कार मागे घेतला आहे.

 

 

दरम्यान दि.10 मार्चच्या अर्थमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयांचे शासन आदेश 10 दिवसात न काढल्यास महासंघातर्फे मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असे शिक्षक महासंघाने शासनास कळविले आहे. मात्र विद्यार्थी हितासाठी पेपर तपासणी सुरू राहील, असे म.रा.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी म्हटले आहे, 
 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...