आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- विधानसभेत आरोग्य विभागाच्या पुरवण्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी सरकारवर चौफेर टीका केली. सिव्हिल हॉस्पिटल वैद्यकीय शिक्षणाकडे ट्रान्सफर केले असे सांगतात, आता आम्हाला पण कुठेतरी ट्रान्सफर करा, असे संतप्त झालेले खडसे यांनी यावेळी सुनावले.
...तर हॉस्पिटलला कुलूप ठोका
आरोग्य सेवा द्यायची नसेल तर हॉस्पिटलला कुलूप ठोका. समारंभपूर्वक बंद करण्याचा कार्यक्रम करु. नुसती लाखांची आरोग्य शिबिरे घ्यायची आणि उपचारासाठी मुंबईला या असे म्हणून चालत नाही, असे खडसे म्हणाले. जिल्हा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने जनता त्रस्त आहे. MBBS नसतील, BAMS डॉक्टर्स द्या, अशी मागणी खडसेंनी केली. नातेवाईक जेव्हा एखाद्याचा मृतदेह आमदारांच्या दारावर आणून ठेवतात, तेव्हा आम्ही काय करायचे? असा प्रश्न खडसेंनी उपस्थित केला.
आरोग्य मंत्र्यांशी फोनवर चर्चा केली, तर डॉक्टर पाठवतो म्हणतात, त्याला लागतात चार तास. तोपर्यंत 10 जणांचे 100 होतात. हातात दगड घेऊन असतात, आम्ही काय करायचे? असा प्रश्नही खडसेंनी विचारला. डॉक्टर नाहीत, टेक्निशियन नाही, मग नर्सेसला पगार कशाला द्यायचा? असा सवाल खडसेंनी विचारला. जळगाव मेडिकल कॉलेजला एक रुपयाची तरतूद नाही. गेल्या चार दिवसात झालेले दोन मृत्यू डॉक्टरांच्या अभावी झाल्याचा दावाही खडसेंनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.