आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलिफंटा बेटाच्या विद्युतीकरणाचे आज लोकार्पण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-  मुंबईपासून जवळच असलेल्या जगप्रसिद्ध घारापुरी (एलिफंटा) बेटाच्या विद्युतीकरणाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (ता.२२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते यांच्यासह पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांची प्रमुख उपस्थिती राहणार अाहे. युनेस्को मान्यताप्राप्त एलिफंटा बेट पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत अाहे. यापूर्वी या ठिकाणी डिझेल विद्युत जनित्राद्वारे वीजपुरवठा केला जात होता. मात्र अाता महावितरणने समुद्राच्या खालून २२ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनी टाकून या ठिकाणी वीजपुरवठा सुरू केला अाहे. राज्यात प्रथमच वीजवाहिनी समुद्रतळातून टाकण्यात आली. महावितरण या भागात वीज पोहोचवण्यात यशस्वी झाली.  या  बेटावरील शेतबंदर, राजबंदर, मोराबंदर या तिन्ही गावी २०० केव्हीची  रोहित्रे लावण्यात आली आहेत.
बातम्या आणखी आहेत...