आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणीबाणीत कारावास भाेगणाऱ्यांना मिळणार दहा हजार रुपयांची पेन्शन - चंद्रकांत पाटील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - १९७५च्या अाणीबाणीत लोकशाही रक्षणासाठी तुरुंगवास भाेगलेल्या व्यक्तींना पेन्शन देण्याच्या निर्णयावर बुधवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने शिक्कामाेर्तब केले. एक महिन्यापेक्षा जास्त काळ कारावास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा १० हजार रुपये, तर महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना मासिक ५ हजार पेन्शन मिळेल. 


संबंधित व्यक्ती हयात नसल्यास पत्नीला निम्मी पेन्शन मिळेल. हा अध्यादेश लवकरच निघेल. त्यानंतर तुरुंगवास भाेगलेल्या व्यक्तींना प्रतिज्ञापत्रासह जिल्हाधिकाऱ्यांकडे  पेन्शनसाठी अर्ज करावा लागेल. जिल्हा प्रशासन संबंधित व्यक्ती ज्या तुरुंगात हाेती तेथील कागदपत्रांची छाननी करून खातरजमा करेल. त्यानंतर पात्र पेन्शनधारकांची यादी सामान्य प्रशासन विभागाकडे जाईल.

 

राज्यात १५ हजार लाभार्थी  
आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेले राज्यात सुमारे १५ हजार लोक आहेत. यातील बहुतांश समाजवादी चळवळ व संघाशी संबंधित अाहेत. या व्यक्तींना दहा हजार रु. पेन्शन देण्यासाठी राज्य सरकारच्या तिजाेरीवर २०० कोटींचा बोजा पडेल.

 

बातम्या आणखी आहेत...