आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतमालाच्या निर्यातीसाठी सहा शहरांत एक्स्पोर्ट प्रोसेसिंग सेंटर्स : सुरेश प्रभू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शेतकऱ्याचे उत्पादन वाढल्यानंतर उत्पन वाढेलच अशी स्थिती नाही. त्यामुळे शेतमालावर प्रोसेसिंग करण्यासाठी  राज्यात सहा शहरांत एक्स्पोर्ट प्रोसेसिंग सेंटर्स सुरू करण्यात येतील. यासाठी शहरांची निवड करा, अशी सूचना केंद्रीय उद्योग-वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

 

सहापेक्षा अधिक सेंटर झाले तरीही हरकत नसल्याचे सांगत या केंद्रांवरूनच आंतरराष्ट्रीय पातळीवर शेतमालाची निर्यात शक्य होईल, असे प्रभ्ू यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. यापुढील काळात महाराष्ट्रात निर्यातीचे हब निर्माण करण्यात येणार असून मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राचा माल निर्यात करणे सोपे होईल, असे ते म्हणाले. तसेच देशात ३००  जिल्ह्यांत होणाऱ्या उत्पादनाला जिऑग्राफिकल इंडिकेशन देण्यासाठी नोंदणी करण्यात येत असल्याचेही प्रभू म्हणाले. प्रभू यांनी रविवारी वेरूळला भेट दिल्यानंतर हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी वाणीज्य व्यापार मंत्रालयाच्या वतीने घेण्यात येणारे निर्णय आणि नागरी हवाई मंत्रालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या निर्णयाचा फायदा कसा होईल, याची माहिती त्यांनी दिली.


एक्सपोर्ट हब तयार होणार 

प्रभू म्हणाले की, नाशिकचा भाजीपाला मुंबईत जातो. तर लासलगावचा कांदा देशभरात जाते. मात्र उत्पादन वाढल्यानंतर अनेकदा भाव मिळत नाही. निर्यात करायची असेल दर्जा ठरवावा लागतो. त्यासाठी एक्सपोर्ट प्रोसेसिंग सेंटर तयार करून हवाई वाहतुकीच्या माध्यमातून ही निर्यात करण्यात येणार आहे. संयुक्त अरब अमिरात व सौदी अरबने या खरेदीसाठी मान्यता दिली असल्याचे ते म्हणाले.


३०० जिल्ह्यात मिळणार जिऑग्राफिकल इंडिकेटर्स : देशात जिऑग्राफिकल इंडिकेटर्स हा  नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पैठणी साडी कुडाळमध्ये तयार करता येणार नाही.त्यामुळे स्थानिक माणसाला त्याचे मूल्य मिळावे या उद्देशाने ३०० जिल्ह्यांत त्या-त्या मालाची नोंदणी सुरू आहे. मराठवाड्यातल्या अशा वस्तू-मालास या माध्यमातून इंडिकेशन मिळेल व फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. 


कार्गोच्या माध्यमातून निर्यात : रात्रीच्या वेळी देशाअतंर्गत हवाई वाहतूक होत नाही. परदेशातील विमाने काही प्रमाणात येतात. त्यामुळे रात्री कार्गो विमाने चालवण्याचा विचार करत आहोत. या माध्यमातून शेतमालाची निर्यात करणे सोपे होईल आणि त्याचा फायदा  शेतकरी तसेच लघु उद्योजकांना होईल, असे प्रभू यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...