आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी आहे सध्याची मनोरा आमदार निवास इमारत; मिळतात या 5 स्टार सुविधा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सध्याची मनोरा आमदार निवास ही इमारत पाडण्यात येणार आहे. या ठिकाणी नवीन आमदार निवास इमारत बांधण्यात येणार आहे. आमदार निवासात एकूण चार टॉवर असून एकूण 336 फ्लॅट आहेत. पहिल्या दोन विंगचं 1994 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. 

 

 

उर्वरित दोन विंगचे उद्घाटन मनोहर जोशी यांनी 1995 रोजी केले होते. इमारत धोकादायक परिस्थितीत असल्याचा मुद्दा नेहमी चर्चेला आला असून, गतवर्षी न्यायाधीश एम एल तहलियानी यांनी बांधकाम विभागाला हलक्या दर्जाचे बांधकाम करण्यावरुन फटकारले होते. 

‘मनोरा’ येथे निवासस्थान असलेल्या मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आमदारांना १ लाख रुपये दिले जातील. त्यांना सध्या सदनिका दिली जाणार नाही. ते आमदार दक्षिण मुंबई किंवा अन्यत्र कुठेही सदनिका भाड्याने घेऊन राहू शकतात. याविषयाचा निर्णय त्यांच्यावर आहे.

 

 

महिला आमदारांना मंत्रालयानजीकच्या आकाशवाणी आमदार निवासासह अन्य आमदार निवासस्थानात सदनिका देण्यास प्राधान्य दिले जाईल. काही आमदारांची ‘मनोरा’ येथे एक सदनिका आणि अन्य आमदार निवासस्थानात एक सदनिका असेल, त्यांना भाडे म्हणून 50 सहस्र रुपये देण्यात येतील.

 

 

पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...