आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पाय फुटले, रक्तबंबाळ झाले पण हिंमत नाही हारले मोर्चेकरी शेतकरी!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नाशिक ते मुंबई असे 180 किमीचे अंतर गेली सहा दिवस कापत मुंबईत पोहचलेल्या किसान लाँग मार्चमुळे सरकारची धडकी भरली आहे. 30 हजारांहून अधिक आंदोलक राजधानी मुंबईत आले असून, त्यांनी आझाद मैदानावर मुक्काम ठोकला आहे. दरम्यान, हे लाल वादळ रोखण्यासाठी सरकार कामाला लागले असून, आंदोलक मोर्चेकरांशी बोलणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सहा मंत्र्यांची समिती गठित केली आहे. ही समिती आंदोलकांशी चर्चा करत राहील. या समितीत चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख आदी वरिष्ठ मंत्र्यांचा समावेश आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक वर्षा निवासस्थानी घेतली. त्यात समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या चर्चेदरम्यान, सचिव दर्जाचे अधिकारीही उपस्थित आहेत.

 

शेतकऱ्यांच्या मोर्चा मुंबईत पोहोचल्यानंतर बॉलिवूडमधूनही त्यांना पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे. अभिनेता रितेश देशमुख याने शेतक-यांना पाठिंबा दिला आहे तर, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेतक-यांचे कौतूक केले आहे. सहा दिवस चालत 180 किमी अंतर पार करून आपल्या मागण्या शांत पद्धतीने मांडणे हे जबरदस्त आहे. मंडे मोटिवेशन यापेक्षा भारी असू शकत नाही. अभिनेत्री हुमा कुरेशीने मोर्चाचा मुंबईतील फोटो ट्विट करुन शांततेने निघालेल्या या मोर्चाला सलाम असल्याचे म्हटले आहे. पक्षभेद विसरत मोर्चाला पाठिंबा देण्याचे आवाहन हुमा कुरेशीने केले आहे.

 

किसान लाँग मार्चच्या आंदोलकांच्या 12 जणांच्या शिष्टमंडळ आणि सरकार यांच्यातील वाटाघाटीसाठी बैठक विधानभवनातील सचिवालयात सुरू झाली आहे. आंदोलक मोर्चेकरांकडून आमदार जे पी गावित, अजित नवले, अशोक ढवळे यांच्यासह 12 जणांचे शिष्टमंडळ आहे तर सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या समितीतील सहा मंत्री व सचिव दर्जाचे अधिकारी उपस्थित आहेत. बैठकीच्या आधीच आंदोलकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, मोर्चेकरी आंदोलकांचे फोटोज....

बातम्या आणखी आहेत...