आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू; मृतांची ओळख पटविण्याचे आव्हान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातग्रस्त ट्रक. - Divya Marathi
अपघातग्रस्त ट्रक.

मुंबई- मुंबई-गोवा महामार्गावर उसारघर येथे दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. धडक झाल्यानंतर या दोन्ही ट्रकनी पेट घेतला. त्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मागील बाजूने येणाऱ्या एका दुचाकीस्वाराचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.हा अपघात आज पहाटेच्या दरम्यान घडला.

 


हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये दोन्ही ट्रकचा अक्षरश: चक्काचूर झाला. दरम्यान अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती. पोलिस घटनास्थळी  असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.  ट्रक मुंबईहून चिपळूनला आणि चिपळूनहून मुंबईला चालले होते. स्थानिक नागरिकांनी लगेच धाव घेत या दोन्ही ट्रकला लागलेली आग विझवली. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...