आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नात जेवल्याने 90 जणांना विषबाधा; एका मुलाची प्रकृती चिंताजनक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पालघर तालुक्यातील माकुणसार येथील एका लग्न समारंभात भोजनानंतर 80 ते 90 जणांना अन्नातून विष बाधा झाली आहे. या सर्वांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दखल करण्यात आले असून एका मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. 

 


माकुणसार येथील विवेक बालकृष्ण वर्तक यांच्या घरी लग्न होते, या लग्नात आज दुपारी जवळपास 300 हून अधिक वऱ्हाडी व पाहुण्यांनी पनीर व गाजर हलवा हे पदार्थ खाल्ले. त्यानंतर या सर्वांना उलट्याचा त्रास होऊ लागला. या सर्वांना नजीकच्या रुग्णालयात हलवले व त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात 35 ते 40 जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच सफाला ग्रामीण रुग्णालयात 40 ते 45 व महिमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात 10 ते 25 रुग्णांना दाखल केले असून धवळे मेमोरियल हॉस्पिटलमध्ये काही रुग्णांना दाखल केले आहे.