आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्रिकर मुंबईतील लीलावती रुग्णालयात पुन्हा होणार दाखल; पुढील उपचारासाठी अनिश्चितता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर स्वादूपिंडाच्या विकारावरील उपचारासाठी आज पुन्हा मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. लीलावती रुग्णालयातून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पर्रिकर हे पुढील उपचारासाठी अमेरिकेत जाण्याची शक्यता आहे.

 


गोमेकॉ रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, पर्रिकरांनी घरातूनच कामाला सुरुवात केली होती. त्यांनी अनेका महत्त्वाच्या फाईल्स क्लिअर केल्या आहेत. आपल्या गैरहजेरीत कोणतीही कामे अडू नयेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मंत्र्याला 50 लाखांपर्यंत निधी खर्च करण्याची परवानगी दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.

 


पर्रिकरांना 15 फेब्रुवारीला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फूड पॉयझनिंगच्या त्रासानंतर पोटात दुखू लागल्याने, प्रथमत: त्यांच्यावर गोव्यातील बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार करण्यात आले. मात्र अधिकच्या उपचारासाठी त्यांना मुंबईत आणण्यात आले  होते.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...