आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री मेघना नायडूचे घर लुटणाऱ्या दाम्पत्याला गोवा पोलिसांकडून अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री मेघना नायडू. - Divya Marathi
अभिनेत्री मेघना नायडू.

मुंबई- अभिनेत्री मेघना नायडूच्या घरात चोरी करणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे. मेघनाच्या गोव्यातील बंगल्यात राहणाऱ्या भाडेकरुंनी तिच्या घरातील लहान-सहान गोष्टीही चोरुन पोबारा केला होता.

 


कलंगुट पोलिसांनी आरोपी दाम्पत्याला बेड्या ठोकल्या. 32 वर्षीय प्रिन्सराज चवीराज आणि 32 वर्षीय शर्मिल दलाल यांना अटक करण्यात आली आहे. दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. मेघनाच्या घरातील केअरटेकर सुहासिनी राऊतला या दोघांनी सव्वा लाख रुपयांचा गंडा घातला होता. मुलांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांनी वेळोवेळी पैसे उकळले होते. राऊत यांनी 26 फेब्रुवारी रोजी पोलिसात या प्रकरणी तक्रार नोंदवली होती.

 

 

मेघना नायडूने फेसबुकवरुन या प्रकाराची माहिती दिली होती. त्याचप्रमाणे भाडेकरु म्हणून राहणाऱ्या दाम्पत्याचा फोटोही तिने शेअर केला होता. गोव्यातील कंडोलिम भागात मेघनाच्या मालकीचा बंगला आहे. आरोपींनी आपण मुंबईतील वरळीचे रहिवासी असून न्यूझीलंडमध्ये नोकरी करत असल्याचं सांगितले होते. बनावट आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स देऊन त्यांनी घर भाड्यावर घेतले होते.

 


पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...