आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबईतील शिवाजी पार्कमधील मैदानात आज भव्य मेळावा होत आहे. या मेळाव्यातील राज ठाकरेंच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सायंकाळी सातच्या सुमारास राज ठाकरे शिवतीर्थावर कार्यकर्त्यांना संबोधित करतील.
राज ठाकरे यांचा पक्ष मनसेच्या स्थापनेला नुकतीच 12 वर्षे पूर्ण झाली आहे. राज ठाकरे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. देशासह महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर ते भाष्य करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या ध्येय धोरणांबाबत ते काय बोलतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. सोबतच येत्या एप्रिल आणि मे महिन्यात ते राज्यव्यापी दौरा करणार आहेत. राज यांनी सांगितले की, मनसेचे नेते आणि पदाधिकारी 21 मार्चपासून राज्यव्यापी दौर्याला सुरुवात करणार आहेत. जनतेशी संपर्क वाढवणे हा या दौर्यामागील उद्देश आहे.
शरद पवार मनसे मेळाव्याला उपस्थित राहणार?-
मनसेने सालाबादप्रमाणे यंदाही मराठी नववर्षदिनी अर्थात गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर शिवाजी पार्क मैदानावर ‘पाडवा मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. राज यांनी या पाडवा मेळाव्याचे शरद पवारांना निमंत्रण दिल्याचे समजते. शरद पवारांसोबतच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
पुढे स्लाई़डद्वारे पाहा, मनसेने राज यांच्या आजच्या सभेसाठी सोशल मिडियातून कसे मराठी स्फुल्लिंग पेटवले ते....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.