आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुढीपाडवा: हिंदू मराठी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने शोभयात्रांची धूम, पाहा फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आज चैत्र शुद्ध प्रतिप्रदा अर्थातच हिंदू मराठी नववर्ष. राज्यात नववर्षाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. मुंबईत गिरगाव भागात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. तिकडे, डोंबिवलीतही मराठी जनांनी उत्साहात मराठी नववर्षाचे स्वागत केले.

 

गुढीपाडव्याचा सन
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनातली आढी


- या शब्दांत बहिणाबाईंनी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच मराठी दिनदर्शिकेच्या पहिला दिवसाचे वर्णन केले आहे. निसर्गातल्या चैतन्याचे, परिवर्तनाचे, नव्या सृष्टीचे स्वागत करत असताना मांगल्याचे, पावित्र्याचे, समृद्धीचे प्रतीक म्हणून नववर्षी आपण गुढी उभारतो. आनंदाने या नूतन वर्षाचे स्वागत करू या.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, मुंबईत हिंदू मराठी नववर्षाचे कसे झाले स्वागत..... 

बातम्या आणखी आहेत...