Home | Maharashtra | Mumbai | Happy Birthday Dr.Prakash Amte, Animal Love Exclusive Photos News In Marathi

REAL HERO: नक्षली भागात रुग्णसेवा; डॉ.प्रकाश आमटेंनी चक्क घरात पाळलेत सिंह, बिबटे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 26, 2017, 10:53 AM IST

महाराष्‍ट्रातील गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासींसाठी एक दाम्पत्य अहोरात्र झिजत आहे. ‘हेमलकसा’अतिशय दुर्गम प्र

 • Happy Birthday Dr.Prakash Amte, Animal Love Exclusive Photos News In Marathi

  महाराष्‍ट्रातील गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासींसाठी एक दाम्पत्य अहोरात्र झिजत आहे. ‘हेमलकसा’अतिशय दुर्गम प्रदेश जिथे वीज, रस्ते यासारख्या पायाभूत सुविधांचा नाहीत. अशा दुर्गम भागातील आदिवासींवर वैद्यकीय सेवा देणारे तसेच वन्य प्राण्यांसाठी नंदनवन फुलवणारे डॉ.प्रकाश आमटे हे 'द रियल हिरो’ ठरले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांचा आज वाढदिवस. या अनुषंगाने आम्ही आपल्याला या रियल हीरोची माहिती घेऊन आलो आहोत.

  डॉ. प्रकाश आमटे यांनी बुलंद आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांच्या जोरांवर अनेक पीडित, मागासलेल्या लोकांना प्रकाशवाट दाखवली आहे. त्यांचे आयुष्य पार बदलून टाकले आहे. आजही ते नक्षल प्रभावित भागात रुग्णांची सेवा करत आहे. घरात जसे कुत्रा, मांजर पाळले जातात, अगदी तसेच या डॉ.आमटे यांनी सिंह आणि बिबटे पाळले आहेत.

  हेमलकासा हे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील गाव आहे. हेमलकसा येथे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ.प्रकाश आमटे यांचा प्रसिद्ध लोकबिरादरी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नक्षल प्रभावित घनदाट जंगलात राहून आदिवासींना शिक्षण आणि वैद्यकीय सेवा दिली जात आहे. विशेष म्हणजे डॉ.आमटे यांनी जंगली प्राण्यांसाठी आपल्या घरातच एक 'प्राणी अनाथ आश्रम' सुरु केले आहे. अस्वल, सिंह, बिबटे आणि मगरीसह 60 पेक्षा जास्त प्राणी आहेत.

  डॉ.प्रकाश आमटे हे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय चिरंजिव आहेत. बाबा आमटे यांनी लोक बिरादरी प्रकल्पाची स्थापना केली होती. समाजाने दूर लोटलेल्या कृष्टरोगी, अंध, अपंग यांना आधार देण्याचे महान कार्य बाबा आमटे यांनी केले. बाबांनी घेतलेला वसा प्रकाश व विकास या त्यांच्या मुलांनीही समर्थपणे सांभाळला आहे.

  आदिवासींच्या मुलांना मोफत शिक्षण..
  बाबा आमटेंचे विचार आजही लोक बिरादरी प्रकल्पातून समाजापर्यंत पोहोचवले जात आहेत. दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्याया मोफत शिक्षण दिले जाते. येथील अनेक विद्यार्थी आज सरकारी अधिकारी आणि पोलिससेवेत आहेत.

  'THE REAL HERO'
  डॉ.प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आधारीत 2014मध्ये एक मराठी सिनेमा आला होता. 'डॉ. प्रकाश आमटे द रिअर हीरो' असे या सिनेमाचे नाव आहे. डॉ. आमटे यांची भूमिका अभिनेता नाना पाटेकर यांनी साकारली होती.

  पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, डॉ.प्रकाश आमटे यांचे निवडक PHOTO...

Trending