आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'नोटांवर महात्मा गांधीजी नको, वीर सावरकर हवेत, भारतरत्न पुरस्कारही द्या\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय चलनाच्या नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटोऐवजी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा फोटो छापण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय हिंदू महासभेने केली आहे. तसेच वीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली आहे. 

 

वीर सावरकर यांनी ब्रिटिशाविरूद्ध लढून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे. त्याची आठवण म्हणून नोटांवर सावरकरांचा फोटो छापण्यात यावा अशी मागणी हिंदू महासभेचे प्रमुख स्वामी चक्रपाणी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

 

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची जयंती सोमवारी (28 मे) साजरी करण्यात आली. त्यानिमित्तानेच हिंदू महासभेने केंद्र सरकारकडे नोटांवर गांधींऐवजी सावरकरांचा फोटो छापण्यासोबत भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...