आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात उष्णतेची लाट; मराठवाडा, विदर्भात तापमानने चाळीशी ओलांडली; भिऱ्यात 45 अंश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रायगड जिल्ह्यातील भिरा येथे सोमवारी देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील तापमानने चाळीशी ओलांडली आहे. ब्रम्हपुरी, अकोला, वर्धा, सोलापूर, परभणी येथे तापमान जवळपास 40 अंश सेल्सियसच्या आसपास नोंदले गेले आहे.  तर अहमदनगर, नागपूर, नाशिक, नांदेड, पुणे, सांगली, सातारा, वेंगुर्ला येथे तापमान 37 ते 39 अंश दरम्यान आहे. 

 

 

मुंबईत रविवारी तापमान तब्बल 8 अंशाने वाढून 41 अंशापर्यंत पोहोचले होते. हे 2011 नंतर सर्वात जास्त तापमान आहे. जळगाव जिल्ह्यात पारोळा येथेही सोमवारी उष्माघाताने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता.