आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो पत्नीवर करत होता वार, कापत होता गळा; लोक पाहत होते तमाशा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मानखुर्द स्थानकाच्या बाहेर एका व्यक्तीने भरदिवसा आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. यावेळी ही महिला जीवाच्या आकांताने मदतीसाठी ओरडत होती. आता या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यात आरोप सर्वांसमोरच या महिलेवर चाकुने हल्ला करतो आणि तिचा गळा चाकूने कापताना दिसत आहे. 

 

 

अशी घडली घटना
- मानखूर्द पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभांगी इंगळे (वय 27) नावाच्या महिलेवर तिच्या पतीने म्हणजेच विजय इंगळे यांनी जीवघेणा हल्ला केला.
- हे दोघेही घाटकोपर येथील मानखूर्द लिंक रोडवरील जाकीर हुसेन झोपडपट्टीत राहत होते. शुभांगी ही वाशी येथील एसबीआयच्या ब्रँन्चमध्ये स्वीपर म्हणून काम करते.
- सोमवारी सकाळी 7 वाजता ऑफिसला जाण्यासाठी ती निघाली होती. स्टेशनजवळ तिचा पती विजय इंगळे हा तिची वाट पाहत होता.
- ती स्टेशनवर पोहचताच विजयने तिच्यावर हल्ला केला.

 

 

लोक तमाशा पाहत होते
- मानखुर्द हे मुंबईतील एक गर्दीचे ठिकाण आहे. आरोपीने भर बाजारात आपल्या पत्नीवर हल्ला केला. पण कोणीही या महिलेच्या बचावासाठी पुढे आले नाही.
- या हल्ल्यानंतर आरोपी या ठिकाणाहून फरार झाला. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत ही महिला बराच वेळ रस्त्यावर पडली होती. 
- सुमारे 15 मिनिटानंतर लोकांनी हिम्मत दाखवत शुभांगीला जवळच असणाऱ्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले.

 

पतीला झाली अटक
- या घटनेनंतर या महिलेच्या पतीला गोवंडी स्टेशनवरुन अटक करण्यात आली.
- पोलिसांनी सांगितले की या दोघांमध्ये भांडणे झाली होती व ते मागील दोन महिन्यापासून वेगळे राहत होते. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...