आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत हायब्रीड बसेसचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, 2 कोटींची एक बस, पाहा फोटोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईकरांच्या सेवेत आजपासून हायब्रिड बस आली आहे. एमएमआरडीए खरेदी केलेल्या हायब्रीड बसेसचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायब्रिड बसेसचे उद्घाटन शुक्रवारी सह्याद्री अतिथी गृह येथे झाले. यावेळी केंद्रीय मंत्री अनंत गिते व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

मुंबईत आजपासून काही मार्गांवर 25 हायब्रिड बसेस धावू लागल्या आहेत. या बसेस तिकीट दर 10 रूपयापासून 100 रूपयांपर्यत आहे. या बसेस वीजेवर आणि डिझेलवर चालतात. या बसेस बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथून कांदिवली, ठाणे आणि नवी मुंबईसाठी धावणार आहेत. 

 

मेक इन इंडिया अंतर्गत केंद्र सरकारकडून 15 कोटी मिळाले आहेत. त्यातून 25 हायब्रीड बस खरेदी केल्या आहेत. मात्र, या 25 बसेसच्या खरेदीसाठी प्रत्येकी दोन कोटी असे एकूण 50 कोटी खर्च आला आहे. या बसेस बेस्टकडे देण्यात आल्या. आणखी 80 हायब्रिड बसेस पुढील महिन्यात मुंबईकरांच्या सेवेत येतील, अशी माहिती अनंत गीते यांनी दिली. टाटा मोटर्सने या बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकार आणि टाटा यांच्यात 2015 मध्ये याबाबत एक करार झाला होता.

 

मुंबईत हळू हळू 100 टक्के इलेक्ट्रॉनिक बसेस आणल्या जाणार आहेत. बीकेसीत वाहतूक कोंडी मोठी असते. सोबतच मुंबईत प्रदूषण वाढत आहे त्यामुळे एमएमआरडीएमधील लोकांनी आपल्या गाड्या वापरण्याऐवजी या बसेस करावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, या आधुनिक हायब्रीड बसेसचे फोटोज.....