आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'टाटा\' नाव विसरुन स्वत:च्या पायावर उभे राहिले रतन टाटा, आजीने केला सांभाळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- प्रसिद्ध भारतीय उद्योजक रतन टाटा यांचा आज (28 डिसेंबर) वाढदिवस. भारतासह जगभरात औद्योगिक विकासामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. टाटांनी स्वत:च्या विश्वासाचा आणि मूल्यांचा अत्यंत प्रभावी ठसा उमटवला. म्हणूनच उद्योग जगतात ते आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू शकले.

 

रतन टाटा चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले खरे पण त्यांचे बालपण अतिशय अवघड परिस्थितीमध्ये गेले. ते सहा वर्षांचे वय असतानाच त्यांचे आई-वडील (सोनी व नवल टाटा) विभक्त झाले. नंतर आजीनेच टाटा व त्यांच्या भावाचा सांभाळ केला. टाटांनी चॅम्पियन स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. आर्किटेक्‍ट होण्याची मनीषा बाळगून नंतर ते अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले.

 

रतन टाटा जितके मोठे उद्योगपती आहेत, त्यापेक्षाही ते व्यक्ति म्हणून खूप महान आहेत. टाटा ग्रुपचे ते चेअरमन असले तरी संपूर्ण कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये प्रत्येक जणच त्यांच्या कार्यशैलीचा चाहता आहे. येत्या 28 डिसेंबरला त्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त आम्ही रतन टाटांशी संब‍ंधित रोचक गोष्टी घेऊन आलो आहे.

 

पुढील स्लाइडवर वाचा, 'टाटा' नाव विसरुन स्वत:च्या पायावर राहिले उभे...

बातम्या आणखी आहेत...