आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत हाहाकार..इमारतीची संरक्षक भिंत कोसळली, रस्ता खचला, 7 गाडयांचे नुकसान, बिल्डरवर गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-रविवारी रात्रीपासून मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. २४ तासांत शहर व उपनगरांत २३१ मिमी पाऊस कोसळला. त्यामुळे मुंबापुरीला अक्षरश: तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. शहर व परिसरातील विविध घटनांत ५ जणांचा मृत्यू झाला. सकाळी संततधार आणि त्याच वेळी ४ मीटर लाटांची मोठी भरती सुरू होती.


रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या सूचना
वडाळ्यातील 'लाॅइड इस्टेट' या ३२ मजली इमारतीच्या पार्किंगची संरक्षक भिंत पहाटे खचली. १५ वाहनांचा चुराडा झाला. जीवितहानीचे वृत्त नसले तरी या भिंतीला लागून असलेल्या झाेपड्यांतील कामगार अडकल्याची भीती अाहे. इमारतीसमाेरच दाेस्ती बिल्डरच्या एका नवीन इमारतीसाठी पाया खणण्याचे काम सुरू हाेते. एका बाजूला पाण्याचा प्रवाह वाढल्याने माती खचली. इमारतीला तडे गेल्याने मनपाने २४० कुटुंबांना घरे रिकामी करण्याच्या सूचना दिल्या.


पावसाचा इशारा
>२६ जूनला मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात काही जागी मेघगर्जनेसह पाऊस. २७ जूनला मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार. 
>२८ व २९ जून : मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार.


मुंबईत अतिवृष्टीपेक्षा चारपट जास्त पाऊस
- 438%जास्त पाऊस दैनंदिन सरासरीपेक्षा 
- 28.1 मिमी अपेक्षित होता मुंबईत पाऊस 
- 231 मिमी पाऊस बरसला 24 तासांमध्ये 
- 12.3 मिमी महाराष्ट्रात, 33% जास्त


बिल्डरवर गुन्हा..
याप्रकरणी दोस्ती बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक गरोडिया, किसन गरोडिया राजेश शहा अशी बिल्डर्सची नावे असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. दोस्ती बिल्डरने व्हायब्रेटरच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याचाही आरोप केला जात आहे.

 

हेही वाचा.. मुसळधार..मुंबईकर बेहाल, लोकल रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने, ठिकठिकाणी मोठा जाम

 

अनेक मजूर ढिगार्‍या खाली दबले..?

ढिगार्‍याखाली अनेक मजूरही दबल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. नगरसेवक सुफियान वनू यांनी दावा केला आहे की, या घटनेत गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच ढिगार्‍याखाली काही मजुरही दबले गेले आहे. अनेक मजुरांचा संसार उघड्यावर आला आहे. परंतु प्रशासनाकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेमुळे बिल्डिंगलाही धोका असलतयाने दोन विंग रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बिल्डिंग शेजारचा रस्ताही मोठ्याप्रमाणात खचला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

मुसळधार पावसामुळे उपनगरीय वाहतुकीसह मध्ये रेल्वेची सेवाही विस्कळीत झाली आहे. रेल्वे गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. सांताक्रूझ, वडाळा, अंधेरी, वांद्रे, हिंदमाता आणि दादरसहित अनेक परिसरात मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे.

 

सात गाडयांवर कोसळली इमारतीची संरक्षक भिंत.. या घटनेचे फोटो आणि लाइव्ह व्हिडिओ पाण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...