आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा तडाखा, अनेक घरात घुसले पाणी Heavy Rains In Sindhudurg Coastal Areas

कोकण किनारपट्टीला पावसाने झोडपले, घरात घुसले पाणी, अनेक गावांचा संपर्क तुटला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सिंधुदूर्गसह किनारपट्टीला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. मालवण, वेंगुर्ले, देवगड या शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागात पाणी साचले असून शेकडो घरात पाणी घुसले आहे. अनेक ठिकाणी घरांवर झाडे कोसळले आहेत.

 

अनेक गावांचा संपर्क तुटला...
ग्रामीण भागातील अनेक मार्ग पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे वीज व दूरध्वनी यंत्रणाही प्रभावित झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. निवतीमेढा मार्गावरील पूल खचल्याने या भागाचा संपर्क तुटला आहे. खवणे गाबीतवाड्यात पाणी घुसल्याने सात कुटुंबांवर उघड्यावर आली आहेत. मालवण शहरातील अनेक भागांत दुकाने व घरांमध्ये पाणी घुसले.

 

वेंगुर्ले शहरातील हॉस्पिटल नाका, खर्डेकर महाविद्यालय, राऊळवाडा, पिराचा दर्गा, रामेश्‍वर मंदिर आदी भाग जलमय झाल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... कोकणातील पुरस्थिती

 

बातम्या आणखी आहेत...