आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा असा तुटत गेला अखंड भारत...1857 ते 1947 दरम्‍यान तयार झाले 7 नवे देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नवी दिल्ली- हेरगिरीच्या आरोपात अटकेतील भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी पाकमध्ये गेलेली त्यांची आई पत्नीला अत्यंत वाईट अनुभव आला. भेटीपूर्वी पाक अधिकाऱ्यांनी त्यांचे मंगळसूत्र, बांगड्या, टिकली जोडे काढायला लावले. दोघींना कपडे बदलण्यास भाग पाडले. परतताना कुलभूषणच्या पत्नीचे जोडेही परत केले नाहीत. मंगळवारी भारतात परतल्यानंतर आई अवंतिका पत्नी चेतनाने दोन तास परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

 

दरम्यान, कुलभूषण जाधव यांनी पाकच्या लष्करी कोर्टाने मृत्यूदंडची शिक्षा सुनावली आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीसने या फाशीवर स्थगिती लावली आहे. या अनुषंगाने आम्ही आपल्यासाठी रोचक माहिती घेऊन आलो आहोत.

 

1857 ते 1947 पर्यंत अखंड भारत सात देशांत विभागला गेला. वर्ष 1947 मध्‍ये झालेली भारत पाकिस्‍तान फाळणी ही मागील 2500 वर्षांतील देशाची 24 वीं फाळणी होती.

 

इतिहासात हा उल्‍लेखच नाही
ज्‍या राजांनी, शक्‍तींनी मागील 2500 हजार वर्षांत भारतावर आक्रमण केले त्‍यांनी अफगानिस्तान, मॅनमार, श्रीलंका, नेपाळ, तिबेत, भूटान, पाकिस्तान, मालद्वीप किंवा बांग्लादेशावर आक्रमण केल्‍याचा उल्‍लेख इतिहासातील कुठल्‍याच ग्रंथात नाही. त्‍यामुळे हे देश म्‍हणून अखंड भारत असावे याला पुष्‍टी मिळते. पाकिस्‍तान आणि बंगलादेशाची निर्मिती कशी झाली याचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. परंतु, भारताचे तुकडे होऊन इतर देश कसे निर्माण झाले, याची फारशी माहिती कुणाला नाही.

 

(संदर्भ- इंटरनेट रिसर्च, इतिहास आणि काही लेखांवर आधारित. सर्व नकाशांचा वापर स्टोरी प्रेजेंटेशनसाठी केले गेले. )

 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या अखंड भारताचे कसे विभाजन झाले...

बातम्या आणखी आहेत...