आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमांशू रॉय यांच्या नावाने थरथरत होते Terrorist; सोडवली होती लैला खान मर्डर मिस्ट्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  उत्तर प्रदेश ATS चे अॅडिशनल एसपी राजेश साहनी यांनी मंगळवारी सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. एडीजी (कायदा व सुव्यवस्था) आनंद कुमार म्हणाले की, एटीएस मुख्यालयातील साहनी यांच्या रूममध्ये पोलिस पथक गेल्यावर त्यांना तेथे साहनी जमिनीवर पडलेले आढळले. त्यांच्या डोक्यात गोळी झाडलेली होती. ही घटना दुपारी 1 वाजेदरम्यान घडली.

 

साहनी यांच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू आहे. तथापि, एटीएसमध्ये कार्यरत असताना साहनी यांनी दहशतवाद्यांविरुद्ध अनेक मोठ्या मोहिमांचे नेतृत्त्व केले होते.

 

IPS अधिकारी हिमांशू रॉय यांनी तोंडात गोळी झाडून केली होती आत्महत्या..

सुपरकॉप असे संबोधले जाणारे आयपीएस अधिकारी हिमांशु रॉय यांनी 11 मे रोजी तोंडात गोळी झाडून आत्महत्या केली. महाराष्ट्र पोलिस दलात सहआयुक्तपदी तैनात होते. त्यांच्याकडे एंटी टेरेरिस्ट स्क्वाडची अतिरिक्त जबाबदारी होते.

 

रॉय हे मागील तीन वर्षांपासून ते कर्करोगाने त्रस्त होते. या आजाराला कंटाळून त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले होते.

 

'मुंबई को हाथ लगाना मुश्किल ही नहीं नामुमकिन है'

26/11 हल्ल्यानंतर ‍हिमांशू यांनी एका टीव्ही चॅनलला इंटरव्ह्यू दिला होता. 'मुंबई को हाथ लगाना मुश्किल ही नहीं नामुमकिन है.', असे ठणकावूण सांगितले होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... हिमांशू रॉय यांनी सोडवली होती लैला खान मर्डर मिस्ट्री...

बातम्या आणखी आहेत...