जळगाव आणि सांगली-मिरज-कुपवाड / जळगाव आणि सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेसाठी 1 ऑगस्टला मतदान, आचारसंहिता लागू

जळगाव आणि सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेसाठी 1 ऑगस्टला मतदान, आचारसंहिता लागू.जळगाव आणि सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेसाठी 1 ऑगस्टला मतदान, आचारसंहिता लागू.जळगाव आणि सांगली-मिरज-कुपवाड महापालिकाच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा आज (सोमवार) राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी केली

दिव्य मराठी वेब टीम

Jun 25,2018 03:14:00 PM IST

मुंबई- जळगाव आणि सांगली-मिरज-कुपवाड महापालिकाच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा आज (सोमवार) राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी केली. येत्या 1 ऑगस्ट 2018 रोजी मतदान होणार आहे असून मतमोजणी 3 ऑगस्ट 2018 रोजी होईल. तसेच वसई-विरार शहर महापालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी याचवेळी होणार आहे. संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे...

- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 4 ते 11 जुलै

- 12 जुलैला उमेदवारी अर्जांची छाननी

- अर्ज मागे घेण्याची तारीख 17 जुलै

- निवडणूक चिन्ह वाटप : 18 जुलै

- मतदान : 1 ऑगस्ट 2018

- मतमोजणी : 3 ऑगस्ट 2018

जळगाव महापालिका

- मुदत समाप्तीची तारीख 19 सप्टेंबर 2018

- प्रभाग - 19

- जागा - 75

- एकूण लोकसंख्या - 4 लाख 60 हजार 228

- मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 65 हजार 15

- आरक्षण - महिलांसाठी 38 जागा, अनुसूचित जातीसाठी 5, अनुसूचित जमातीसाठी 4 , तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 20 जागा राखीव

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा.. सांगली, वसई-विरार महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम...

सांगली महापालिका - मुदत समाप्तीची तारीख 13 ऑगस्ट 2018 - प्रभाग - 20 - जागा - 78 - एकूण लोकसंख्या - 5 लाख 2 हजार 793 - मतदारांची संख्या - सुमारे 4 लाख 23 हजार 366 - आरक्षण - महिलांसाठी 39 जागा, अनुसूचित जातींसाठी 11, अनुसूचित जमातींसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 21 जागा राखीववसई-विरार महापालिका - प्रभाग क्र. 97 च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणूक होत आहे. - 1 ऑगस्ट 2018 रोजी मतदान - 3 ऑगस्ट 2018 रोजी मतमोजणी

सांगली महापालिका - मुदत समाप्तीची तारीख 13 ऑगस्ट 2018 - प्रभाग - 20 - जागा - 78 - एकूण लोकसंख्या - 5 लाख 2 हजार 793 - मतदारांची संख्या - सुमारे 4 लाख 23 हजार 366 - आरक्षण - महिलांसाठी 39 जागा, अनुसूचित जातींसाठी 11, अनुसूचित जमातींसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 21 जागा राखीव

वसई-विरार महापालिका - प्रभाग क्र. 97 च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणूक होत आहे. - 1 ऑगस्ट 2018 रोजी मतदान - 3 ऑगस्ट 2018 रोजी मतमोजणी
X
COMMENT