आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खूशखबर..राज ठाकरेंच्या वाढदिवशी पेट्रोलवर मिळणार प्रति लिटर 4 रुपयांची सूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देशभरात अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा 14 जून रोजी वाढदिवस आहे. यानिमित्त मनसेकडून पेट्रोलवर 4 रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. मनसेच्या या निर्णयाने सर्वसामान्यांना एक दिवस दिलासा मिळणार आहे.

 

मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर येत्या 14 जून रोजी ही सवलत देण्यात येणार असल्याचे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितले.

 

मनसे सरकारमध्ये नसूनही पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त देत असेल, मोदी सरकारला का शक्य नाही, असा सवाल मनसेने केला आहे.  केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. परंतु या सरकारला पेट्रोलचे दर कमी करण्यात अपयश आले असल्याची टीका मनसेने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...