आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत नेरोलॅक पेंट्सच्या गोडाऊनला आग; लाखों रुपयांचा माल जळून खाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- परळ भागातील नेरोलॅक पेंट्‍सच्या गोडाऊनला सोमवारी सकाळी आग लागून लाखों रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आगीमुळे श्रीराम मिलजवळील गणपतराव कदम मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

 

बीएमसीच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, गोडाऊनमधील लाखों रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. अद्याप आगीचे कारण समोर आले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळवले.

 

दरम्यान, गेल्या आठवड्यात चेंबूरमधील भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) एका ‍रिफायनीत भीषण आग लागली होती. बॉयलरच्या स्फोटात 45 कर्मचारी जखमी झाले होते.

 

बातम्या आणखी आहेत...