आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • अल्पवयीन मुलांना विवस्र करून मारहाणीचा व्हिडिओ ट्‍विटरवर; राहुल गांधींना नोटीस Notice Has Been Served To Rahul Gandhi

जामनेर: अल्पवयीन मुलांना विवस्र करून मारहाणीचा व्हिडिओ ट्‍विटरवर; राहुल गांधींना नोटीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जळगाव जिल्ह्यातील वाकडी येथील विहिरीत अंघोळ केल्याने गेल्या आठवड्यात मातंग समाजाच्या दोन मुलांना विवस्र करून अमानुष मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीचा व्हिडिओ ट्‍विटरवर शेअर केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाने (एमएससीपीसीआर) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह टि्‍वटर कम्युनिकेशन प्रा.लि. कंपनीला नोटीस बजावली आहे. 

 

पीडित 2 मुलांची ओळख उघड केल्यावरुन राहुल गांधी यांना 10 दिवसांत उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दिली होती. याप्रकरणाची दखल घेत बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगेंनी त्यांनी ही नो‍टीस बजावली आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी मात्र अद्याप आम्हाला नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले आहे.

 

किमान सहा महिने तुरुंगवास शक्य

राहुल गांधी यांनी 15 जून रोजी केलेल्या टि्वटमधून अल्पवयीन पीडित मुलांची ओेळख उघड झाल्याने बालहक्क संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप तक्रारकर्ते अमोल जाधव यांनी केला आहे. हा आरोप सिद्ध झाल्यास राहुल गांधी यांना किमान सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.

 

10 दिवसांत मागितले उत्तर...
- जळगाव येथील रहिवासी अमोल जाधव नामक तरुणाने दिलेल्या तक्रारीवर बालहक्क आयोगाने राहुल गांधी आणि ट्‍विटरला नोटिस बजावली आहे. राहुल गांधी यांनी 10 दिवसांत याबाबत खुलासा करण्‍यास सांगण्यात आले आहे.  
- पोलिसांनी याप्रकरणी ईश्वर जोशी व त्याचा सालदार प्रल्हाद लोहार याला अटक केली. परंतु सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर या प्रकरणावरून देशात राजकारण सुरु झाले होते. राहुल गांधी यांच्यासह भाजप आणि आरएसएसने समाजव्यवस्थेवर भाष्‍य केले होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... जळगाव जिल्ह्यात घडलेल्या 'त्या' घटनेचे फोटो आणि व्हिडिओ..

 

बातम्या आणखी आहेत...