आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'रजनी\'च्या चित्रपटाला प्रथमच सर्वात कमी ओपनिंग; मध्यरात्रीच चाहत्यांनी लावल्या रांगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- 12 वाजेपासून मध्यरात्री मुंबईत चित्रपटगृहात प्रेक्षक  
- 100 पोलिसांची तुकडी चित्रपटगृहाबाहेर तैनात  
- 25-30 कोटींचा पहिल्या दिवसाचा गल्ला  
- 40 कोटी रुपये कबाली, रोबोटची पहिल्या दिवसाची कमाई

 

मुंबई-  दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांतचा बहुचर्चित आणि वादग्रस्त 'काला' हा चित्रपट गुरुवारी देशभरात प्रदर्शित झाला. मात्र, रजनीकांतने राजकारणात प्रवेश केल्याचा परिणाम या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईवर दिसला. परंतु त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साह शिगेला पोहोचलेला दिसला. मुंबईमध्ये भर पावसात चाहत्यांनी चित्रपटगृहात ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत प्रवेश केला.

 

मध्यरात्रीपासूनच हजारो चाहत्यांच्या रांगा
नवी मुंबईतील एका चित्रपटगृहाबाहेर मध्यरात्री 12 वाजेपासूनच हजारो चाहत्यांनी रांगा लावल्या होत्या. तर नियंत्रणासाठी सुमारे 100 पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते. चित्रपट व्यवसायविषयक तज्ज्ञ गिरीश जोहर यांच्या मते, 'काला'ने पहिल्या दिवशी देशभरात 25-30 कोटींच्या जवळपास गल्ला जमवला. वास्तविक, 'रोबोट,' 'कबाली' या चित्रपटांनी 40 कोटींच्या घरात सुरुवात केली होती.

 

पुढील आठवड्यात बॉलिवूडमधून सलमान खानचा रेस आणि हॉलीवूडच्या बड्या बॅनरचे चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने व्यवसायावर अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...