आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री चोरुन दूध प्यायचे धीरुभाई अंबानी; या मित्राने वाचवली होती यमनमधील नोकरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धीरूभाईंचे यमनमधील मित्र भरतभाई शाह - Divya Marathi
धीरूभाईंचे यमनमधील मित्र भरतभाई शाह
मुंबई- रिलायन्स उद्योग समुहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी आज हयात नाही. आज (28 डिसेंबर) धीरुभाईंचा 86 वा वाढदिवस. या अनुषंगाने आम्ही आपल्याला धीरुभाईंचा स्ट्रगल, त्यांचे बिझनेस कौशल्य आणि खासगी आयुष्याविषयी रंजक माहिती घेऊन आलो आहे.

 

धीरुभाईंच्या आयुष्यात 'ती' 8 वर्षे ठरली फार महत्त्वाची...
मे 1950 मध्ये नोकरीसाठी यमनमध्ये गेलेले धीरुभाई डिसेंबर 1958 मध्ये मायदेशी परतले. त्यांनी रिलायन्स कंपनी सुरु केली. धीरुभाईंच्या संपूर्ण आयुष्यात 1950-58 ही 8 वर्षे महत्त्वाचे ठरल्याचे काही मोजक्याच लोकांना माहीत असावे.

 

यमनमध्ये केली 200 रुपये महिन्याची नोकरी

धीरूभाई यमनला नोकरीसाठी गेले होते. सुरुवातील त्यांनी एका पेट्रोलियम कंपनीत 200 रुपये महिन्याची नोकरी केली. नोकरी सोडली तेव्हा त्यांचा पगार 1100 रुपये होता.

 

धीरुभाई यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आपल्यासाठी खास माहिती घेऊन आलो आहे. धीरूभाईंविषयी जाणून घेण्यासाठी Dainikbhaskar.com ने त्यांच्या खास 3 मित्रांशी संवाद साधला. तिघांनी धीरुभाईंसोबत काम केले होते. 2002 मध्ये धीरूभाईंचे निधन झाले. पण, तिघे आजही अंबानी फॅमिलीच्या संपर्कात आहेत. मीडिया ही माहिती पहिल्यांदाच प्रकाशित होत आहे.

 

(कटेंट सोर्स: 1950 ते 1958 या काळात यमनमध्ये धीरूभाई यांच्यासोबत एका कंपनीत काम करणारे त्यांचे मित्र भरतभाई शाह. यमनच्या ब्रिटिश कॉलनीत राहाणारे एम. लॉकमॅन, कंपनीच्या मेसमध्ये साफसफाईची व्यवस्था पाहाणार्‍या टीमचे मेंबर एलाद. 5 पिढ्यांपासून यमनमध्ये राहाणारे हिम्मत जगानी यांचे चिरंजिव परूभाई जगानी. कोकिलाबेन यांनी एका मॅगझिनला दिलेला इंटरव्ह्यू आणि इंटरनेट रिसर्च)

 

पुढील स्लाइड्सवर वाचा... यमनच्या करन्सीमधून चांदी काढून धीरूभाईंनी कमावले होते 1 लाख रुपये...

बातम्या आणखी आहेत...