आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोनी कपूरमुळे टेंशनमध्ये होती श्रीदेवी,पतीनेच विकल्या तिच्या अनेक मालमत्ता; काकाचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांचे 24 फेब्रुवारीला दुबईत निधन झाले होते. चेन्नईमधील क्राऊन प्लाझामध्ये श्रीदेवींसाठी आज (रविवार) प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी त्यांच्या दोन्ही मुली खुशी आणि जान्हवी चेन्नईला रवाना झाल्या आहेत. प्रार्थना सभेला बॉलिवूडसह तामिळ फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रिटीज उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

 

श्रीदेवींच्या काकांनी केला धक्कादायक खुलासा...

या दरम्यान, श्रीदेवींचे काका वेणुगोपाल रेड्डी यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. ते म्हणाले की, श्रीदेवी ही मागील काही महिन्यांपासून प्रचंड दु:खी होती. ती तणावात वावरत होती. ती जगासाठी चेहर्‍यावर हास्य दाखवत होती. परंतु आतून प्रंचड दु:खी होती. तिची आर्थिक स्थिती योग्य नव्हती.

 

- डीएनएमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, रेड्डी यांनी एका तेलुगु न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक  खुलासा केला आहे. श्रीदेवींच्या आयुष्यात खूप दुःख होते. त्या फक्त मुलींसाठी चेहर्‍यावर हास्य दाखवत होत्या.

- पती बोनी कपूर यांचे सिनेमे पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरुन काढण्यासाठी त्यांनी श्रीदेवींच्या  अनेक मालमत्ता विकल्या होत्या. त्यामुळे श्रीदेवीची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे त्या खूप अस्वस्थही होत्या, असे रेड्डी यांनी सांगितले.

 

पतीमुळेच पुन्हा सिनेमात आल्या श्रीदेवी
श्रीदेवी यांनी पुन्हा सिनेमात काम करावे, असे बोनी कपूर यांनी तिला सांगितले होते. कुटुंबांचा सांभाळ आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, तिने बॉलिवूडमध्ये पुन्हा काम सुरु केले होते, असेही रेड्डी यांनी सांगितले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित‍ फोटो...

बातम्या आणखी आहेत...