आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • एसटीची भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून...तिकीट दरात 18 टक्के वाढ ST Bus Rent Increase Today Mid Night

औरंगाबाद ते मुंबई भाडे 403 वरून 460 रुपयांवर; प्रतिटप्पा नवीन दर 18 % भाडेवाढ लागू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  एसटी महामंडळाच्या सर्व बसेसच्या तिकीट दरात १५ जूनच्या मध्यरात्रीपासून १८% वाढ लागू झाली. त्यामुळे साध्या बसचे औरंगाबाद ते मुंबई भाडे ४०३ रुपयांवरून ४६० रुपयांवर गेले आहे. डिझेलचे वाढते दर तसेच कामगारांची  वेतनवाढ यामुळे एसटीच्या खर्चात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे ही दरवाढ करण्यात अाली.  भाडेवाढ सूत्रातील डिझेल, टायर दरवाढ व महागाई भत्त्याच्या मूल्यात बदल झाल्याने सुधारित प्रवास भाडेवाढ लागू करण्यास राज्य परिवहन प्राधिकरणाने शुक्रवारी सायंकाळी मंजुरी दिली. 

 

५ रुपयांच्या पटीत वाढ
सर्व भाडे ५ रुपयांच्या पटीत वाढवले आहे. २.५० ते ५ रुपये ही आकारणी ५ रुपये गृहीत धरावी तसेच ००.५० ते २.४९ रुपये ही रक्कम दुर्लक्षित करण्यात यावी, असे निर्देश आहेत. 

 

पुढील स्लाईडवर वाचा,  प्रतिटप्पा नवीन दर....

बातम्या आणखी आहेत...