आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Inquiries From The Bitcoin Scam ED: Minister Of State For Home Ranjit Patil

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...तर बिटकॉइन घोटाळ्याची ईडीकडून चौकशी: गृह राज्यमंत्री रणजित पाटील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई, पुणे, नांदेड आणि कोल्हापूरसह राज्यातील हजारो गुंतवणूकदारांची गेनबिटकॉइन डॉट कॉम या संकेतस्थळाद्वारे सुमारे २ हजार कोटींची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरज भासल्यास या प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालयाद्वारे चौकशी करण्याबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधानसभेत दिले. 


  गेनबिटकॉइन डॉट कॉम या संकेतस्थळाद्वारे गुंतवणूक योजना सुरू करून राज्यातील अनेक शहरांतील सर्वसामान्य गुंतवणूकदारांची सुमारे दोन हजार कोटींची फसवणूक केल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणी नांदेड येथील विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चारपैकी एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे रणजित पाटील यांनी सांगितले. तर, पुणे येथील दत्तवाडी पोलिस ठाण्यातही या प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाज हा परदेशात राहत असल्याने त्याच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्याची कारवाई सुरू असल्याचेही ते म्हणाले. बिटकॉइन हे एक आभासी चलन असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्याच्या वापरास जरी मान्यता दिली नसली तरी त्यावर बंदीही घातलेली नाही,