आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्झरीयस आहे प्रियांका चोप्राचे न्यूयॉर्कमधील घर, प्रथमच समोर आले Inside Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - क्राइम ड्रामा शो 'क्वांटिको'मधून हॉलिवूड करिअरची सुरुवात करणारी प्रियांका चोप्रा अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर अॅक्टीव्ह आहे. अनेक दिवसांपासून विदेशात राहणाऱ्या प्रियांकाने न्यूयॉर्कमध्ये एक अपार्टमेंटही खरेदी केले आहे. नुकतेच एका इंटरनॅशनल वेबसाईटने प्रथमच प्रियांकाच्या घराचे काही इनसाइड फोटो शेअर केले आहेत. त्यावरून तिचे घर अत्यंत लक्झरियस असल्याचे दिसत आहे. प्रियांकाच्या या घरात चार रूम आहेत. अथ्यंत इनोव्हेटिव्ह आणि कलात्मक पद्धतीने हे घर डेकोरेट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे एका पॉश एरियात तिचे घर आहे. तिच्या घराच्या आसपास मोठे-मोठे रेस्तरॉ आणि हँगआऊट प्लेस आहेत. रिपोर्ट्सच्या मते तिचे हे घर सुमारे 200 कोटींचे आहे. 


या चित्रपटांत काम करतेय प्रियांका 
- हॉलिवूडमध्ये बिझी असल्याने प्रियांका काही दिवस बॉलिवूडपासून दूर होती. 2016 मध्ये आलेल्या 'जय गंगाजल' नंतर एकाही चित्रपटात ती झळकली नाही. पण नुकताच एक बॉलिवूड चित्रपट साइन केल्याचे तिने ट्वीटरवर सांगितले.
- प्रियांकाने एक फोटो शेअर केला आहे. त्यात एक स्टोरी ड्राफ्ट आहे. त्याचे नाव 'the sky is pink' असे आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये प्रियांकाने लिहिले, 'And it begins #prep #hindimovie' 
- चित्रपटाचे नाव 'The sky is pink' असे असेल की नाही, याची माहिती मिळालेली नाही. ऑगस्ट 2018 मध्ये चित्रपटाचे शुटिंग सुरू होणार आहे. प्रियांकाबरोबरच फरहान अख्तर चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे. 
- यापूर्वी प्रियांकाने अली अब्बास जफरचा 'भारत' चित्रपटही साइन केला आहे. त्यात ती सलमानबरोबर झळकणार आहे. शुटिंगसाठीच ती अमेरिकेहून मुंबईला आलेली आहे. लवकरच शुटिंग सुरू होऊन हा चित्रपट पुढील वर्षी ऑगस्टमध्ये रिलीज होईल. 


पुढे पाहा, प्रियांका चोप्राच्या घराचे Inside Photos..

बातम्या आणखी आहेत...