आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलला प्रायोजकांचा ‘थंडा’ प्रतिसाद; नामांकित कंपन्यांनी फिरवली पाठ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- इंडियन प्रीमियर लीग (अायपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या ११ व्या सत्राला एप्रिलमध्ये सुरुवात हाेत अाहे. अल्पावधीत ही लीग प्रचंड लाेकप्रिय झाली. मात्र, अाता याच लीगच्या प्रायाेजकत्वाकडे काही नामांकित कंपन्यांनी पाठ फिरवली अाहे.


या लीगच्या प्रक्षेपण हक्कांसाठी १६ हजार कोटींची हमी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून देण्यात अाली. मात्र,तरीही आयपीएलच्या गत पुरस्कर्त्यांनी निविदा प्रक्रियेत रस न दाखवल्यामुळे धक्का बसला आहे. बीसीसीआयने जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आयपीएल सेंट्रल स्पॉन्सरशिपसाठी निविदा मागवल्या होत्या. १७ जानेवारीपर्यंतची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आल्यानंतर, फेब्रुवारीच्या मध्यावर होणारी संभाव्य घोषणा दिसत नाही. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलद्वारा निविदांची छाननी करून त्यावर निर्णय होणार आहे. मात्र बैठकीची घोषणा न झाल्यामुळे ‘स्टार स्पोर्ट््स’ला काळजीत आहे.  


त्या अटीने अडचणी : प्रायाेजकत्वासाठी  एकाच उद्योग, उत्पन्नाचे दोन पुरस्कर्ते मान्य नसल्यामुळे निर्णय घेण्यास अवधी लागणार आहे. एस बँक पुढे सोबत नसेल.   मारुती-सुझुकीनेही प्रक्रियेतून अंग काढून घेतले.    


गत कंपन्यांना रस नाही

 व्होडाफोन व फ्यूचर ग्रुप यांनीही आयपीएलमधील आपला सहभाग पुढे कायम ठेवण्याबाबत हालचाल केली नाही. त्यामुळे यंदा नव्याने तगड्या पुरस्कर्त्याच्या शाेधाचा पेच मंडळासमाेर पडला अाहे. दुसरीकडे ‘एअरटेल’ ही आयपीएलपासून दूरच राहिली आहे. मात्र ‘जीओ’ने सहभागी आठ संघांमध्ये गुंतवणूक करून आपली इच्छा व्यक्त केली आहे.  

 

बीसीसीअाय अाशेवर 

‘सेंट्रल स्पॉन्सर्स’ जोपर्यंत बीसीसीआयकडून निश्चित होत नाही तोपर्यंत निविदा प्रक्रिया बंद होणार नाही. त्यामुळे पूर्वीच्या पुरस्कर्त्यांनी माघार घेतल्यानंतर त्यांचे त्या-त्या उत्पादनांचे पुरस्कर्ते पुढे येतील अशी आशा बीसीसीआय बाळगून आहे. ‘स्ट्रॅटिजिक टाइम आऊट’ यासाठी गेली ३ वर्षे पुरस्कार देणाऱ्या ‘सीएट’ने मात्र यापुढेही पुरस्कार देण्याचा इरादा स्पष्ट केला. सध्या हा एकमेव पुरस्कर्ता आयपीएलच्या हाती आहे.

 

बातम्या आणखी आहेत...