आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामनेर नगरपालिका निकाल: भाजपने सर्व 25 जागा जिंकल्या, नगराध्यक्षपदी साधना महाजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जामनेर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यात मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपने सर्वच्या सर्व 25 जागा जिंकत मोठा विजय मिळवला. सोबतच महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या नगराध्यक्षपदी मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. साधना महाजन यांना 8 हजार 400 मते मिळाली आहेत. 


एकाच वेळी सर्व वाॅर्डांची मतमाेजणी झाल्याने सकाळी 11 वाजताच सर्व निकाल हाती आले. 

भाजपतर्फे नगराध्यक्षसाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे प्रा. अंजली पवार यांच्यात थेट लढत होती. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांनी यंदाच्याही निवडणुकीत एकहाती वर्चस्व राखत सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेनेचा भाजपने दारूण पराभव केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...