आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्याचे जिल्हाधिकारी बी. जी. पवार, गगराणी सीएमओ सचिव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्याचे मुख्य सचिव म्हणून डी. के. जैन यांची नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी तब्बल २७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यानुसार वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी यू.पी.एस. मदान यांची, तर मुंबर्इ महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अायुक्तपदी अार. ए. राजीव यांची नियुक्ती करण्यात अाली अाहे. सिडकाेचे उपाध्यक्ष अाणि व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिवपदाची जबाबदारी साेपवण्यात अाली अाहे. 


नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाचे प्रधान सचिव अाणि अायुक्त (गुंतवणूक अाणि राजशिष्टाचार) लाेकेश चंद्रा यांच्याकडे सिडकाेचे उपाध्यक्ष अाणि व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी साेपवण्यात अाली अाहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संताेष कुमार यांची एमएसएसअायडीच्या संचालकपदी, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव अाणि मुख्य कार्यकारी अधिकारी एम. एन. केरकेट्टा यांची महाराष्ट्र राज्य खादी अाणि ग्रामाेद्याेग विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विक्रीकर विभागाचे विशेष अायुक्त पराग जैन- नैनुतिया यांची महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष अाणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात अाली अाहे.  


एमएसएसअायडीचे व्यवस्थापकीय संचालक एस. अार. दाैंड यांची मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाचे सचिव अाणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी,  तर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष अाणि व्यवस्थापकीय संचालक राजीव कुमार मित्तल यांच्याकडे मंत्रालयाच्या वित्त विभागाचे प्रधान सचिव (व्यय) म्हणून जबाबदारी साेपवण्यात अाली अाहे. पी. वेलारासू यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्यपदी, माहिती तंत्रज्ञान संचालक एम. शंकरनारायण यांची महापालिका प्रशासन विभागाचे संचालक, मुंबर्इ इमारत दुरुस्ती अाणि पुनर्बांधणी मंडळाचे मुख्य अधिकारी सुमंत भांगे यांची महाराष्ट्र राज्य मत्स्यविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात अाली अाहे.  


पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांच्याकडे अाता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी साेपवण्यात अाली अाहे. मुंबर्इ गृहनिर्माण विकास मंडळाचे मुख्य अधिकारी यांची मंत्रालयाच्या वित्त विभागाचे सहसचिव, तर दीपेंद्रसिंग कुशवाह यांची मुंबर्इ गृहनिर्माण विकास मंडळाचे मुख्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात अाली अाहे. मीरा भार्इंदर महानगरपालिकेचे अायुक्त बी. जी. पवार यांच्याकडे अाता जालन्याचे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी साेपवण्यात अाली अाहे. मुंबर्इच्या महापालिका प्रशासन विभागाचे संचालक वीरेंद्र सिंग यांची नागपूर महानगरपालिकेचे अायुक्त, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त अायुक्त सुनील चव्हाण यांची रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांची माहिती तंत्रज्ञान संचालक म्हणून नियुक्ती करण्यात अाली अाहे.  

बातम्या आणखी आहेत...