आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - लोअर परेलच्या कमला मिल्स कंपाऊंडमध्ये गुरुवारी रात्री आग लागल्याने 14 जणांचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी इमारतीच्या छतावरील मोजोज रेस्तरॉमध्ये खुशबू बन्सल (28) हिची बर्थडे पार्टी सुरू होती. सेलिब्रेशन सुरू असतानाच खुशबू आणि तिच्या मित्रांचाही श्वास गुदमरल्याने मृत्यू झाला. प्रत्यक्षशदर्शींनी सांगितले की, रेस्तरॉ आणि पबमध्ये आग लागल्यानंतर एकच धावपळ उडाली होती.
प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितले?
- अंधेरीमध्ये आयव्हीएएफ सेंटर चालवणाऱ्या गायनॅकॉलॉजीस्ट डॉ. सुलभा अरोरा यांनी ट्वीटरवर लिहिले, मी त्याच रेस्तरॉमध्ये होते.
- अचानक धावपळ उडाली होती. कोणीतरी मला धक्का दिला आणि मी खाली पडले. पळताना लोक मला चिरडून पुढे जात होते.
- माझ्या डोक्यावरील छप्परला पूर्णपणे आग लागलेली होती. ते कधीही खाली कोसळणार होते. मी प्रचंड घाबरलेली होते.
- पण मी त्याठिकाणाहून कशी बचावून निघाले मलाच कळले नाही. नक्कीच काही शक्ती माझे संरक्षण करत होत्या.
काही सेकंदात पसरली आग
- रेस्तरॉमध्ये अलेल्या दुसऱ्या एक डॉक्टर म्हणाल्या की, मी मित्रांबरोबर त्याठिकाणी गेले होते.
- आम्ही बिल काऊंटरवर पेमेंट करत होतो, तेवढ्यात मला रेस्तरॉच्या एका कोपऱ्यात छोटीसी आग लागल्याचे मला दिसले.
- ती आग अगदी लहान होती, पण काही सेकंदात आगीने भीषण स्वरुप धारण केले.
- रेस्तरॉमध्ये अचानकच पळापळ सुरू झाली. पण माझ्या मित्राने मला सांभाळले.
- आम्ही दोघे किचनकडे आलो आणि त्याठिकाणी तयार केलेल्या सर्व्हीस एक्झिटमधून बाहेर निघालो.
- रेस्तरॉच्या स्टाफनेही आम्हाला मदत केली.
टॉयलेटमध्ये श्वास गुदमरून अनेक ठार
- मुंबई फायर ब्रिगेडच्या माहितीनुसार त्यांना रात्री 12.30 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. अपघातानंतर अनेक लोक जीव वाचवण्यासाठी एक्झिट गेटकडे पळाले पण त्याठिकाणी सामान ठेवल्याने रस्ता बंद होता.
- रेस्तरॉमधील लोक पळाले होते, असे सांगितले जात आहे. जीव वाचवण्याचा मार्ग कोणालाही दिसत नव्हता, त्यामुळे अनेक लोक टॉयलेटमध्ये घुसले. याठिकाणी अनेकांचे मृतदेह मिळाले. पोस्टमॉर्टमनंतर या सर्वांचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाल्याचे समोर आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.